Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miraroad Crime: पाच वर्षीय चिमुरडीला बेदम मारहाण ; अमानुष छळ करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक

मिरारोड परिसरात पाच वर्षाच्या चिमुरडीला सांभाळणाऱ्या महिलेने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2025 | 05:13 PM
पाच वर्षीय चिमुरडीला बेदम मारहाण ; अमानुश छळ करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक

पाच वर्षीय चिमुरडीला बेदम मारहाण ; अमानुश छळ करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक

Follow Us
Close
Follow Us:

मिरारोड/ विजय काते :-मीरारोड येथे एका पाच वर्षीय मुलीला बेदम मारहाण करून चटके दिल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मुलीचा सांभाळ करणाऱ्या महिलेने आणि तिच्या अल्पवयीन मुलाने मिळून या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या आईच्या तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, गंभीर अवस्थेतील मुलीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित मुलीची आई मुंबईतील अंधेरी परिसरात राहते. कामानिमित्त ती मुलीची देखभाल करू शकत नव्हती, त्यामुळे तिने वैशाली डेढीया या आरोपी महिलेकडे मुलीला सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, विश्वासघात करत या महिलेनं तिच्या मुलासोबत मिळून मुलीला अमानुष छळले.

मंगळवारी रात्री, वैषाली डेढीयाच्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला बेदम मारहाण केली. रागाच्या भरात तिला उचलून बेडवर आणि जमिनीवर आपटले. या मारहाणीत मुलीच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर मुलगी वेदनांनी कळवळत असताना ती   बेशुद्ध झाली. मात्र, वैशालीला वाटले की ही मुलगी नाटक करत आहे. त्यामुळे तिने अजूनही थांब न घेता तिला क्रूर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक ! पत्नीचा गळा आवळून पतीने केला खून; चारित्र्याच्या संशयावरून घडलं सारं काही…

गरम उलथण्याने दिले चटके

वैशालीने आपल्या मुलाला गॅसवर उलथणे गरम करण्यास सांगितले. त्यानंतर स्वतःच्या हाताने ती चटके गालावर, छातीवर, पोटावर, दोन्ही मांड्यांवर, डाव्या गुडघ्यावर आणि पाठीवर दिले. या भयंकर छळामुळे मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत.

रुग्णालयात तातडीने हलवले

मुलगी गंभीर जखमी झाल्यानंतर तिला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मुलीच्या आईला जेव्हा या अमानुष अत्याचारांची माहिती मिळाली, तेव्हा तिने तात्काळ नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैशाली अजय डेढीया आणि तिच्या १७ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. नयानगर पोलीसांनी या महिलेला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीवर बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली जात आहे.

Sheena Bora Case : शीना बोरा हत्याकांडाला वेगळे वळण? CBI ने इंद्राणी मुखर्जीच्या मुलीला बनवले साक्षीदार

पोलिसांचा पुढील तपास सुरू

या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, समाजात या प्रकारच्या अमानुष वर्तनाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तपास करत आहेत, आणि लवकरच या घटनेतील सर्व बाबींचा खुलासा केला जाणार आहे.

Web Title: Miraroad crime five year old girl brutally beaten police arrest woman for inhuman torture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • crime
  • Miraroad Crime case

संबंधित बातम्या

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश
1

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश

वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्रीला केली अटक
2

वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्रीला केली अटक

Pune Crime: दौंड हादरले! गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणावर जीवघेणा हल्ला, जागीच सोडले प्राण, कारण काय?
3

Pune Crime: दौंड हादरले! गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणावर जीवघेणा हल्ला, जागीच सोडले प्राण, कारण काय?

Satara Crime :सातारा हादरलं! गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली, एकीला वाचवण्यात यश
4

Satara Crime :सातारा हादरलं! गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली, एकीला वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.