एकाने 13 वर्षीय मुलीवर केली बळजबरी
गोंदिया : ‘तू माझ्याशी बोलत जा, मला भेटत जा, हा घे मोबाईल’ अशी एका रोमिओने 13 वर्षीय मुलीला बळजबरी केली. मात्र, ती विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात अडकली नाही. त्यामुळे आरोपीने तिचा दोनदा विनयभंग केला. विद्यार्थिनीने हा प्रकार शाळेतील वरिष्ठांना सांगितला. त्यामुळे त्या रोडरोमिओविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) देवरी शहरात घडली.
हेदेखील वाचा : चित्रपटगृहात स्थिती वाईट, ओटीटीवर रंगणार खेळ! जाणून घ्या ‘खेल खेल में’ कुठे होणार रिलीज!
बदलापूरसह महाराष्ट्र आणि देशातील महिला तसेच विद्यार्थिनींवरील अत्याचाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. अशातच देवरी 13 वर्षीय मुलगी गुरूवारी (दि. 22) आपल्या खासगी वसतिगृहातून सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत जात होती. यावेळी शिवाजी चौकात खुशाल कैलाश राऊत (वय 18, रा. परसटोला) हा रोमिओ तिचा पाठलाग करत आला. त्याने त्या मुलीचा हात पकडत तिला मोबाईल दिला. मात्र, तिने तो घेण्यास नकार दिला असता तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती मुलगी आपल्या शाळेत निघून केली.
दुसऱ्या दिवशी आरोपीने केला पुन्हा पाठलाग
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा ती सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत जात असताना त्याने तिचा पाठलाग करत, तू माझ्याशी बोल, माझ्याशी संबंध ठेव. अन्यथा तुला मारून टाकीन, असे म्हणत शाळेसमोरच तिचा हात पकडला.
संताप अनावर होताच मुलीने केला आरडाओरड
या प्रकाराने त्या मुलीचा संताप अनावर झाला. तिने आरडाओरड केला. त्यानंतर खुशाल तेथून पळून गेला. मुलीने याची माहिती वसतिगृहात आल्यावर अधीक्षकांना दिली. महिला अधीक्षकांच्या सोबत देवरी पोलिस ठाणे गाठून विद्यार्थिनीने याची तक्रार दिली. तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या रोमिओला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची तुरूंगात रवानगी केली.
हेदेखील वाचा : ‘या’ कारणामुळे साडेतीन वर्षीय चिमुकलीची हत्या, मृतदेह ट्रॉली बॅगमधून फेकून दिला; आई प्रियकरासह फरार