
धक्कादायक ! बागेतच अल्पवयीन मुलावर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार; चॉकलेटचं आमिष दाखवलं अन्...
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १० वर्षाच्या मुलावर तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी येथे घडली आहे. पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित अल्पवयीन मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे त्याला फसवून तिघांनी चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी अल्पवयीन मुलावर अत्याचार केला आहे. घटनेनंतर मुलगा परत घरी आला. तो त्यावेळी घाबरलेला होता. त्याच्या आईने विचारणा केली असता त्याने हा घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन आरोपी अल्पवयीन
आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्या अल्पवयीन मुलांची शनिवारी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर एका १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ११५ (२) व ३(५) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Shikrapur Crime: ओळख वाढवली, लग्नाचे आमिष दिले अन् हॉटेलवर नेऊन…; शिक्रापूरमध्ये घडली धक्कादायक घटना
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन प्रेत घरात पुरले, नालासोपोरातील खळबळजनक घटना
दरम्यान, मुंबईच्या नालासोपारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. ही हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तरुणाचा मृतदेह घरातच पुरला. घरातून दुर्गंधी येत असल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून घराच्या जमीनीखाली त्याचे प्रेत पुरुन पत्नी फरार झाल्याची खळबळजनक घटना नालासोपारात उघड झाली आहे. नालासोपारा पुर्वेकडील धानीवबाग येथील ओमसाई वेल्फेअर सोसायटीच्या चाळीत पत्नी गुडीया उर्फ चमनदेवी आणि ८ वर्षीय मुलासह राहणारा ३५ वर्षीय विजय चौहान हा ६ जुलैपासून बेपत्ता झाला होता.बाजुच्याच घरात त्याचा भाऊ अखिलेश रहात होता.त्याने आपल्या भावाबद्दल वहीनीला विचारले असता,तो कुर्ल्याला कामाला गेल्याचे तिने सांगितले होते.तसेच घरातील जमीनीच्या टाईल्स लावण्याचे काम अर्धवट टाकून तो गेल्याचे सांगून गुडीया वहीनीने त्याच्याकडून नवीन टाईल्सही त्याच्याकडून लावून घेतल्या होत्या.
त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतरही भाऊ न परतल्यामुळे त्याची विचारणा करण्यासाठी अखिलेश गेला असता,वहीनी मुलाला घेवून गायब झाल्याचे दिसून आले.त्यामुळे सदरची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर अखिलेशने सोसायटीचे अध्यक्ष धनंजय मिश्रा यांच्या समक्ष घराची तपासणी केली असता, काही दिवसांपुर्वी लावलेल्या टाईल्स ची त्याला आठवण झाली.त्या टाईल्स काढून खोदकाम केल्यावर आत विजयचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.६ जुलै पासून बेपत्ता असलेल्या विजयचा अशाप्रकारे मृतदेह २१ जुलै ला हाती लागला.
दरम्यान,शेजारी राहणारा २० वर्षीय मोनू विश्वकर्मा हा सुध्दा घटना घडल्यापासून गायब झाला होता.त्यामुळे त्याच्यावरही विजयच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.विजयच्या हत्येच्या योजनेची सूत्रधार चमन देवी आहे.तिचे शेजारी राहणारा मोनू विश्वकर्माशी प्रेमसंबंध होते.त्यातून या दोघांनी या परिसरात मोबाईल दुकान चालवणारा सर्वेश गिरी (३५) याच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप अखिलेश ने व्यक्त केला आहे.घराखालील जमीनीत मृतदेह पुरल्यास कोणालाही संशय येणार नाही,अशा योजनेतून हा कट करण्यात आला.मात्र,नवीन लावलेल्या टाईल्स ने हा कट उघड केला. या घटनेनंतर मोनू,चमनदेवी आणि गिरी हे फरार झाले आहेत.याप्रकरणी कोणत्याही निकषापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत.तपास अंती सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले.तपास करण्यासाठी पोलीसांनी ही दोन्ही घरे सील केली आहेत.या भयानक हत्येच्या गूढतेने येथील लोकांची झोप उडवली आहे.