Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री, 48 तासांत पोलिसांनी केली सुटका

मुंबईत धक्कादायक घटना! मामा-मामीने 5 वर्षांच्या चिमुकलीला 90 हजारांना विकलं आणि पुढे तिला 1.80 लाखांना पुन्हा विकण्यात आलं. पोलिसांनी तांत्रिक तपास करून 48 तासांत मुलीची सुटका केली आणि पाच आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 26, 2025 | 01:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मामा-मामीनेच 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून 90 हजारांना विक्री केली.
  • विकत घेतलेल्या व्यक्तींनी मुलीला दुपटीने—1.80 लाखांना पुढे विकले.
  • पोलिसांच्या वेगवान तपासामुळे 48 तासांत चिमुकलीची सुटका; 5 जण अटकेत, एक फरार.
मुंबई: मुंबई येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून मामा आणि मामीने तिची 90 हजार रुपयांत विक्री केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर ज्यांनी या मुलीची खरेदी केली त्यांनी पुढे जाऊन या मुलीला एक लाख ८० हजारात विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ४८ तासात या गुन्ह्याचा मामा- मामीसहित पाच जणांना अटक केली आहे.

Beed Crime: धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय घडलं?

वाकोला येथे राहणारी पाच वर्षांची चिमुकली ही घराजवळून बेपत्ता झाल्याची तक्रार २२ नोव्हेंबर दाखल करण्यात आली होती. वाकोला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी सात पथके तयार केले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. तपास पथकांनी सलग दोन दिवस रात्र एक करून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपस केला. यादरम्यान त्यांना एक संशयित रिक्षाचे वर्णन मिळाले.

हि रिक्षा सांताक्रुज येथून पनवेल येथे गेली आणि परत आली. रिक्षाचा क्रमांक न मिळाल्याने केवळ वर्णनावरून सांताक्रूझ पूर्वेकडून चालक लतीफ अब्दुल माजिद शेख याला आणि रिक्षाला ताब्यात घेतले. लतीफ याने चिमुकलीचा मामा लॉरेन्स निकलेस फर्नांडिस आणि मामी मंगल यांनीच अपहरण केल्याची माहिती दिली. पनवेल येथून चिमुकलीच्या मामला आणि मामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी ओळखीचा तरुण करण मारुती सणस याला ९० हजार रुपयांना चिमुकलीची विक्री केली असे कबुल केले.

दुप्पट रकमेवर पुन्हा विक्री

पोलिसांनी करणला पनवेलच्या उसर्ली बुद्रुक येथून शोधून काढले आणि ताब्यात घेतले. त्याने आणखी दोन महिलांची नावे सांगितली. त्याने चिमुकलीला एक लाख ९० हजारांना वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या दोघींना विकल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत वृंदाला शोधून काढले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करत तिला सांताक्रूझ येथील घरी आणून पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी लॉरेन्स, मंगल, लतीफ, करण आणि वृंदा यांना अटक केली असून अंजलीचा शोध सुरू आहे.

 

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिमुकलीचे अपहरण कोणी केले?

    Ans: तिचे मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मामी मंगल यांनीच अपहरण करून विक्री केली.

  • Que: मुलीची सुटका कशी झाली?

    Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही, संशयित रिक्षाचे वर्णन आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे 48 तासांत मुलीला शोधून सुरक्षित परत आणले.

  • Que: या प्रकरणात किती आरोपी अटकेत आहेत?

    Ans: एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे; एक महिला आरोपी अंजली फरार असून शोध सुरू आहे.

Web Title: Mumbai crime uncle and aunt sold the child sold it further for double the amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
1

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

Rani Baug Mumbai : राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल
2

Rani Baug Mumbai : राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल

Beed Crime: धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
3

Beed Crime: धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…
4

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.