crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबईः मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाने आपल्याच १६ वर्षीय मिटला शीतपेयाच्या विष देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस यांनी तपास केला असता रुग्णालयात दाखल असलेल्या १९ वर्षीय तरुणाने शीतपेयात विष मसाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Cyber Crime: गुन्हा दाखल झाला सांगितलं अन्…; महिलेची सात लाखांची फसवणूक
नेमकं काय प्रकार?
आरोपी हा १९ वर्षीय मुलगा आहे आणि मृतक हा १६ वर्षाचा आहे. आरोपी हा मृतकाचे चुलत काका आहे. आरोपीने २९ जूनला मृतकाच्या घरी फोन करून आम्ही शीतपेय प्यायल्यानंतर तुमच्या मुलगा बेशुद्ध पडला असून मीही त्याच बाटलीतील शीतपेय प्यायल्यामुळे माझ्याही पोटात प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार मृतकाचे वडील आरोपीच्या घरी गेले.
तेव्हा मृतक हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या शेजारी आरोपी पोटात दुखत असल्यामुळे ओरडत होता. अश्या परिस्थतीत मुलाच्या वडिलांनी स्थानिक डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांनी तपासणी करून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
१४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्यावेळी पोलिसांनी उपचार घेणाऱ्या तरुणाची चौकशी केली असता दोन मित्रांनी त्याला पिण्यासाठी स्टिंग हे शीतपेय प्याला दिले. आरोपीने मृतकाला सांगितले की त्याची शीतपेय पिण्याची इच्छा नाही आहे. बाटलीतील सर्वाधिक शीतपेय मृतक प्यायला व त्यानंतर दुपारी तो माझ्या घरी झोपला. मी थोडेसेच शीतपेय प्यायलो व झोपलो. पण माझ्या पोटात दुखू लागल्यामुळे मला जाग आली. त्यावेळी मी मृतकाच्या उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. असे सांगितले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने उपचार घेत असलेल्या तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. त्यावेळी उपचार घेणाऱ्याने आरोप केलेल्या मित्रांनी आपला याप्रकरणाशी काहीच संबंध नसून उलट आम्ही मृतकासोबत २९ जूनला रिक्षात बोलत बसलो होतो. त्यावेळी आरोपी तिथे आला. आमच्यासोबत मृतकाला पाहून मोहम्मद संतापला. तो जावेदच्या बाजूला नेऊन बडबडत असल्याचे आम्ही ऐकले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांना सर्वप्रथम उपचार घेणाऱ्या तरुणावर संशय आला.
उपचार घेणाऱ्या तरुणावर संशय निर्मण झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा उपचार होईपर्यंत वाट पहिली. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने शीतपेयातून वीष दिल्याचे कबुल केले. तसेच आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून थोडेसे प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
हत्येचा कारण काय?
मृतक हा काही दिवसापासून आरोपीला टाळत होता. त्याच्याशी नीट बोलत नव्हता, भेटायला येत नव्हता. पैसे हवे असल्यास तो त्याच्याकडे यायचा. इतरवेळेला तो त्याचा फोन उचलत नव्हता. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने हत्येचा कट रचला. तो बकरी ईदला बिहार येथील गावी गेला असताना तेथील शेतामधील उंदीर मारण्यासाठी किटकनाशकाची गोळी वापरत असल्याचे पाहिले होते. ती गोळी एवढी विषारी असते की किटकही त्या गोळीजवळ येत नाही. ही माहिती मिळाल्यानंतर त्याने मृतकाला मारण्यासाठी गोळी खरेदी केली. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर गोळीची भुकटी केली. आणि मृतकाच्या स्टिंग हे शीतपेय आवडत असल्यामुळे त्यांने ती भुकटी शीतपेयात मिसळून त्याला दिली. त्याने थोडेसे पिले आणि मृतकाचे जास्त पिल्याने त्याची मृत्यू झाली.
Crime News : जुन्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…