Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा

नागपूरमध्ये लालसेपोटी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ४४ वर्षीय व्यावसायिकाची हत्या केली. मदतीच्या बहाण्याने कारमध्ये घेऊन दगडाने वार करत खून केला आणि कार-मोबाईल लंपास केले. पोलिसांनी १२ तासात तिघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 02:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मद्यधुंद व्यापाऱ्याला मदतीच्या बहाण्याने कारमध्ये घेतले
  • दगडाने वार करून हत्या; ओळख लपवण्यासाठी कपडे काढले
  • कार व मोबाईल चोरी; पोलिसांनी १२ तासात आरोपींना अटक
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून बेपत्ता असलेल्या एका नामांकित मशीनरी स्पेअर पार्टस व्यावसायिकाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले होते. मृतदेह पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी १२ तासात या हत्येचा उलगडा केला असून तीन विध्यार्थ्यांना अटक केली आहे. महागड्या कार आणि मोबाईलच्या लालसेपायी त्यांनी व्यावसायिकाची हत्या केली.

Chandrapur Crime: बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्रांसह तिघे अटकेत, पिस्तूल-तलवार जप्त

व्यापारी मद्यधुंद, मदतीच्या बहाण्याने कारमध्ये आणि…

मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव सूचित भोजपुरी (४४ वर्षीय) असे आहे. आरोपी तिघेही अभियांत्रिकीचे विध्यार्थी असून कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. परीक्षा दिल्यानंतर तिघे एकत्र फिरत होते. अश्यात वर्धमाननगर पुलावर मद्यधुंद व्यापारी दिसला. त्यांनी त्याला मदतीच्या बहाण्याने कारमध्ये घेतले. भिवापूरकडे फिरवून पुन्हा वाडीला आणले. त्यांनतर पत्नीशी संपर्क केला असता सुरुवातीला घरी आणण्याचा सल्ला दिला नंतर फोन कट करत आरोपींनी प्लॅन बदलला. मुलांना व्यापाराजवळ असलेली कार आणि मोबाईलचा मोह झाला आणि त्यांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला.

कशी केली हत्या?

खडगाव मार्गावरील स्मशान घाटाजवळ नेत सुचितच्या डोक्यावर दगडाने सात वार करून हत्या केली. तसेच ओळख पटू नये म्हणून कपडे काढून सुद्धा फेकले. त्यांनतर मृतदेह नग्नावस्थेत झुडपात फेकला आणि कार आणि मोबाईल घेऊन आरोपी फरार झाले. दुसऱ्या दिवशी नागरिकाला हा मृतदेह आढळला आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पत्नीने मृतदेहाची ओळख पाठवल्यांनतर तपासाला सुरुवात केली. गुन्हा दाखल करून तपासाला वेग आला. पोलिसांनी सापळा रचत अवघ्या १२ तासात तिन्ही आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी झोमॅटो डिलिव्हरी बॉय असून वेगळे राहून काम करत असल्याची माहिती आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून कुटुंबीय हळहळ व्यक्त करत आहे.

Thane Crime: पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: कार आणि मोबाईलच्या लालसेपोटी विद्यार्थ्यांनी खून केला.

  • Que: आरोपी कोण होते?

    Ans: तिघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.

  • Que: पोलिसांनी किती वेळात गुन्हा उलगडला?

    Ans: अवघ्या १२ तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला.

Web Title: Nagpur crime the height of greed students murder businessman and flee with his car murder case solved within 12 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.