crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच मुलाची हत्या झाल्याने आईने आक्रोश केला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक राजकुमार पिंपळीकर असे आहे. त्याच्याच जुन्या मित्रानेच त्याची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
अभिषेक हा लहानपणापासून साध्या परिस्थितीत वाढला. त्याची आई मीना ही स्वयंपाकाचं काम करून संसार चालवत होती. अभिषेक हा खासगी वाहन चालवून घराची जबाबदारी उचलली होती. काही वर्षांपूर्वी तो आणि आरोपी प्रकार गायकवाड हे दोघे मिळून कचरा वेचण्याचे काम करत होते. मात्र, अभिषेकला कचरा वाहनावर चालकाची नौकरी मिळाली. त्याने हळूहळू प्रकाशापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. इथूनच दोघांमध्ये मतभेत सुरु झाले.
रविवारी अभिषेकच्या वडिलांचे श्राद्ध आटोपल्यानंतर तो सायंकाळी बाहेर गेला होता. त्यानंतर त्याला प्रकाश भेटला. त्यांच्यात वाद झाला आणि प्रकाशने अभिषेकवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. साडेनऊच्या सुमारास तो सुरज्मधील रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, चाकूच्या हल्ल्यामुळे झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला.
तो मला मारून टाकेल अशी भीती
या घटनेनंतर आई मीना यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अटकेतील आरोपीचं नाव प्रकाश गायकवाड असे आहे.
चौकशीत प्रकाशने जुना वादच हत्येचं कारण असल्याचे सांगितले. त्याचा दावा आहे की ‘अभिषेक मला मारून टाकेल, अशी भीती होती. म्हणून मी त्याच्यावर आधीच हल्ला केला’, असं आरोपी प्रकाशने सांगितलं.
या संपूर्ण घटनेमुळे सूरजनगर परिसरात शोककळा पसरली आहे. अभिषेकच्या वडिलांचं श्राद्धच्या दिवशी त्याची हत्या झाल्याने त्याची आई पूर्णपणे कोसळून गेल्या आहे. वाठोडा पोलिस पुढील तपासात आरोपीची मानसिकता, जुने व्यवहार आणि वैयक्तिक राग यामागची खरी पार्श्वभूमी शोधत आहेत.