CRIME (फोटो सौजन्य-PINTEREST)
नागपूरमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्या दोन्ही मित्रांमध्ये कोणतेच भांडण नव्हते कोणतेच वाद नव्हते , इतर कोणते कारणही नव्हते फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता, म्हणून त्याचा हेवा वाटत होता. याकारणामुळे १९ वर्षीय मित्राने अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली. हा प्रकार नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. मृतकाचे नाव वेदांत खंडाडे असून आरोपीचे नाव मिथिलेश चकोले असे आहे.
सासूचे दागिने सुनेने लांबवले; तक्रार दाखल, सून फरार….
नेमकं काय घडलं?
वेदांत आणि मिथिलेश दोंघांची चांगली मैत्री होती. 8 एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले. एका पान टपरीवर दोघांनी कोल्ड्रींक घेतले. आरोपी मिथिलेशने नकळतपणे त्याच्या कोल्ड्रींकमध्ये विष टाकले. त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वेदांत आणि मिथिलेशची मैत्री कशी झाली?
वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती. त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकली होती. त्यानंतर ते हुडकेश्वर या परिसरात राहायला आले. त्यानंतर वेदांत आणि मिथिलेश यांची मैत्री झाली. मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे.
पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर घरच्यांची विचारपूस केली. त्याच्या मित्राची चौकशी केली. त्यावेळी सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता आरोपी मिथिलेशला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खंडणीच्या संदर्भात एक पत्र मिळाल्याचे पण पुढे येत आहे. मात्र पोलीस त्याचा तपास करत आहे. या घटनेने हुडकेश्वर परिसरात आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपुरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार
नागपूर शहरातील धरमपेठ परिसरात गोळीबार झाल्याची घटना पुढे आली आहे. सोमवारी रात्री निंबस लॉजसमोर मित्रांसोबत अविनाश भुसारी गप्पा मारत बसले असताना चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात अविनाश भुसारी यांचा मृत्य झाला. अविनाश भुसारी हे ‘सोशा रेस्टॉरंट’चे मालक आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ आले आणि गोळीबार केला. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळीबार करून ही हत्या करण्यात आली.