Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड..; पोलिसांनी फहीम खानची कुंडलीच काढली

हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 19, 2025 | 02:38 PM
Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड..; पोलिसांनी फहीम खानची कुंडलीच काढली
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर:  नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

51 जणांवर गुन्हे दाखल

हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. विशेष म्हणजे, तोच फहीम खान पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेला होता. नागपूर पोलिसांनी या प्रकरणात 51 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, त्यात फहीम खानचे नाव प्रमुख आरोपींपैकी एक म्हणून समोर आले आहे.

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर समोर, कोणाच्या आदेशावरून जमावाने पोलिसांवर हल्ला केला?

एफआयआरनुसार, फहीम खानने सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांना एकत्र करून पोलिसांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्याने विहिंप (विश्व हिंदू परिषद) आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतरही फहीम खानने पुन्हा जमाव गोळा केला आणि परिस्थिती अधिक तणावग्रस्त केली, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

फहीम खान हा 38 वर्षांचा असून, त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी त्याने लोकांना भडकवले आणि “पोलीस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत” असे सांगत आंदोलनकर्त्यांना उत्तेजित केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीम खानने निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभव पत्करावा लागला होता.

नव्याने समाविष्ठ बत्तीस गावांसाठी पुणे महापालिकेने दिले काय? विधीमंडळात विचारण्यात आला प्रश्न

नागपूरच्या 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 मधील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याचा आदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जनजीवन सुरळीत असून, सार्वजनिक वाहतूक सेवा नियमित सुरू आहे. लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत असले तरी काही भागांमध्ये तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे

Web Title: Nagpur violence mastermind police calculate faheem khans horoscope nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Nagpur Violence

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.