crime (फोटो सौजन्य- pinterest)
नुकताच काही दिवसांपूर्वी नागपूरचे प्रख्यात सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तर आणखी सहा संशयित पोलिसांच्या रडारवर आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त राहुल माखनीकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत एक मोठा खुलासा केला आहे.
Pune Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाची फसवणूक; तब्बल 25 हजारांना घातला गंडा
अविनाश भुसारी यांची हत्या टोळीयुद्धात घडल्याची माहिती समोर आली आहे. मारेकरी प्रवेश गुप्ता याला मारण्यासाठी आले होते. मात्र तो हाती न लागल्याने मारेकऱ्यांनी अविनाश भुसारी यांना गोळ्या घालून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. अशी माहिती रविवारी पत्रकार परिषद घेत गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त राहुल माखनीकर यांनी दिली.
का केली हत्या?
पवन हिरेणवार हत्याप्रकरणातील आरोपींना मारण्यासाठी प्रतिस्पर्धी गँगने 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवले होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिस्तुल मिळवण्यात आली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आरोपींना उत्तर प्रदेशातून बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या. पवन हिरेणवार हत्याप्रकरणात जे लोक सहभागी होते किंवा ज्यांनी मदत केली, त्या लोकांना मारायचं असं ठरवलं होत. विशेषतः प्रवेश गुप्ता आणि बांबुर्डे यांची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती.
नागपूरच्या पांढरा बोडी परिसरात प्रवेश गुप्ता हा दरवर्षी आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतो. यामध्ये तो सवतः सहभागी होतो. १४ एप्रिलला आंबेडकरी जयंतीमुळे सगळे पोलीस बंदोबस्तात असतात. त्यामुळे मिरवणुकीत प्रवेश गुप्ताची हत्या झाल्यास पोलिसांना त्याचा शोध लागणार नाही, असा मारेकऱ्यांचा अंदाज होता. या मिरवणुकीतच प्रवेश गुप्ताची हत्या करण्याचा प्लॅन होता. परंतु, प्रवेश गुप्ता 14 एप्रिलला या मिरवणुकीत आलाच नाही. मारेकऱ्यांनी प्रवेश गुप्ताचा शोध घेतला. मात्र, मिरवणूक निघून गेल्यानंतरही प्रवेश गुप्ता मारेकऱ्यांच्या हाती लागला नाही.
दरम्यान मारेकऱ्यांना हिरेणवार हत्याप्रकरणातील दुसरा आरोपी अभि भुसारी याचा चुलत भाऊ अविनाश भुसारी दिसला. प्रवेश गुप्ता हाती न लागल्यामुळे मारेकरी वैतागले होते. त्यामुळे ‘तो नाही तर हा’, असा विचार करुन बाबू आणि बंटी या मारेकऱ्यांनी अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडल्या. बंटीने भुसारी यांच्यावर चार तर बंटीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये अविनाश भुसारी यांचा मृत्यू झाला होता.
आरोपींचा पाठलाग कसा केला
अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडल्यानांतर मारेकरी पळून गेले होते. ते भंडारा, दुर्ग, डोंगरगाव, हावडा, विशाखापट्टणम, तिरुपती, बल्लारशाह असे फिरत राहिले. अखेर पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे बल्लारशावरून ट्रेनने गोंदियाला जात असल्याचे समजले. त्यानुसार नागपूर पोलिसांचा पथक ट्रेनमध्ये चढला. तेव्हा मारेकऱ्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर उड्या मारल्या. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत बाहेर उड्या मारून दोन मारेकऱ्यांना पकडले. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून तिसरा मारेकरी शिबू याला पोलिसांच्या पथकांना ओळखता आले नाही. त्यामुळे शिबू गोंदियापर्यंत पोहोचला. मात्र पोलिसांनी त्याला गोंदियात अटक केली. अशी माहिती पोलीस उपयुक्त राहुल माखनीकर यांनी दिली.
हत्या कशी झाली ?
नागपुरात सोशा रेस्टॉरंट समोर निंबास कॅफे आहे. १४ एप्रिलला सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी आणि निंबस कॅफेचे मॅनेजर आदित्य हे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र बसून आईस गोळा खात होते. यावेळी बाईकवरुन चार जण आले आणि त्यांनी पिस्तूलने गोळ्या झाडून अविनाश भुसारी यांची हत्या केली. गोळ्या झाडून आरोपीने तेथून पळ काढला. भुसारींना व्होकार्ड हॉस्पिटल येथे भरती केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
Bhandara Accident News: मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा घटनास्थळीच मृत्यू