Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील 'त्रिप्ताबाला' बंगल्यातून अटक करण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 01, 2026 | 12:33 PM
Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow Us
Follow Us:
  • भोंदूबाबा अशोक खरात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी अवघ्या ५ मिनिटांच्या कामकाजात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
  • तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
 

Ashok Kharat News:  नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)ला अखेर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (१ एप्रिल) खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातची सुनावणी झाली. यावेळी न्यायधीशांनी त्याला कोठडी सुनावली आहे.

नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासादरम्यान समोर आलेली धक्कादायक माहिती आणि वाढत जाणारी पीडितांची संख्या लक्षात घेता, न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणारे ते ४५ बडे नेते कोण?

न्यायालयातील ५ मिनिटांचे कामकाज

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश बी.एन.ईचपुरानी यांच्या समोर खरातच्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयात हजर होते. कामकाजाला सुरुवात होताच अवघ्या ५ मिनिटांत न्यायालयाने आपला निर्णय दिला.

पहिल्या गुन्ह्यात अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.खरातला जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी त्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. खरातवर दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, त्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे.

एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

विशेष तपास पथकाच्या (SIT) आतापर्यंतच्या चौकशीत खरातचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर भाविकांना ‘आर्थिक गंडा’ घातल्याच्या तक्रारींची जंत्रीही आता वाढत चालली आहे. त्याच्याविरोधात दररोज नवनव्या तक्रारी दाखल होत असल्याने एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

उद्या पुन्हा सुनावणी

आज न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. न्यायाधीशांनी कागदपत्रांची पडताळणी करून तातडीने निकाल दिला. उद्या खरातला दुसऱ्या गुन्ह्यासाठी पुन्हा कोर्टात आणले जाईल, तेव्हा पोलीस पुन्हा एकदा त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे.

 

खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातलाही अटक

अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील ‘त्रिप्ताबाला’ बंगल्यातून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला, त्यानंतर त्यांनी शेजारच्या घराची भिंत ओलांडून फिल्मी स्टाईलमध्ये आत प्रवेश केला आणि हर्षवर्धनला ताब्यात घेतले.

राज्यातील ४५ प्रमुख राजकारणी होते संपर्कात

अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे. या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचे दिसून येते. नाशिक येथे पार पडलेल्या या लग्नसमारंभालाही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या निमित्ताने अशोक खरात आणि विविध पक्षांतील नेत्यांमधील जवळीक अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. असेही म्हटले जाते की, हे नेते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरात यांचा सल्ला घेत असत.

 

 

Web Title: Nashik breaking news fraudster baba ashok kharat sent to 14 days of judicial custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime
  • Nashik Police

संबंधित बातम्या

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
1

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार
2

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’
3

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
4

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.