Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती डिसेंबर २०२५ मध्ये ! खरातच्या कार्यालयातील ही सर्व काळी कृत्यं नीरज जाधवच्या हाती लागली. खरात एकटाच यातून 'मजा' मारत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 20, 2026 | 10:19 AM
ठाकरेंचीही खरातवर लाभाची खैरात

ठाकरेंचीही खरातवर लाभाची खैरात

Follow Us
Follow Us:
  • ऑफिस बॉयच्या एका ‘मास्टरस्ट्रोक’ने खरातचे साम्राज्य पत्त्यासारखे कोसळले
  • कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ हे कार्यालय अशोक खरातच्या विकृत कृत्यांचे केंद्र
  • शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो पाठवून तिला घाबरवले
Nashik Crime : समाजात ‘कॅप्टन’ म्हणून मिरवणारा आणि ‘ओजस प्रॉपर्टीज’च्या नावाखाली साम्राज्य उभे करणारा अशोक खरातने मागील काही वर्षांमध्ये बक्कळ माया कमवली. हवे ते करू शकतो, ही त्याची विचारधारा त्याच्यावरच उलटली. पैशांसाठी पळापळ करणाऱ्या खरातने मागील तीन महिन्यांपासून पैशांच्या जोरावर खूप काही दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याच तालमीत तयार झालेला नीरज जाधव या ऑफीस बॉयमुळे हे शक्य झाले नाही. ५८ महिलांच्या अब्रूला सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या खरातचे हे पाप, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या नीरज जाधवच्या खंडणीच्या मोहामुळे चव्हाट्‌यावर आले आहे.

Nashik Crime: आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ हे कार्यालय केवळ जमिनीच्या व्यवहारासाठी नव्हते, तर ते अशोक खरातच्या विकृत कृत्यांचे केंद्र बनले होते. खरातने अनेक महिलांवर अत्याचार करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज, मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जतन केले होते. स्वतःला ‘साव’ मानणारा खरात या पीडितांच्या हतबलतेचा फायदा घेत आपले साम्राज्य चालवत होता.

फिर्यादीची प्रतिक्षा

या प्रकरणात अनेक महिलांचे व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. पीडित-महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र दोन दिवसांच्या अंतरानेही एकही महिला पुढे आलेली नाही. आता या प्रकरणात कोणीही पुढे आले तर बदनामी होईल, एवढ्या भीतीमुळे तूर्तास फिर्यादी महिला समोर आलेल्या दिसत नाही.

एका ‘मास्टरस्ट्रोक’ने फिरवला फासा

नीरजने पैशांसाठी पीडितांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो पाठवून तिला घाबरवले. जेव्हा खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळली, तेव्हा नीरजने सिडकोतील एका विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहूण्याला पाठवला. हाच त्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ त्याच्यावर उलटला. मेहूण्याने धीर दिल्याने पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे नीरजला खंडणी मिळाली नाही पण या सर्वात खरातच्या साम्रज्याला सुरूंग लागला.

Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

पाच कोटींची खंडणी आणि नीरजची एन्ट्री

या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती डिसेंबर २०२५ मध्ये ! खरातच्या कार्यालयातील ही सर्व काळी कृत्यं नीरज जाधवच्या हाती लागली. खरात एकटाच यातून ‘मजा’ मारत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या ५८ महिलांच्या विलप्सचा वापर करून खरातलाच ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र, खरातने या मागणीला दाद न दिल्याने नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला.

 

Web Title: Nashik crime update neeraj jadhavs masterstroke ends ashok kharats reign of terror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
1

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
2

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
4

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.