Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

नाशिकच्या दत्त मंदिर सिग्नलवर भरधाव कार चालवणाऱ्या २२ वर्षीय चालकाने आधी महिला दुचाकीस्वाराला धडक दिली. कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावरच चालकाने गाडी घातल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 03:34 PM
Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्...

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्...

Follow Us
Follow Us:
  • सिग्नल तोडून भरधाव कार; महिला दुचाकीस्वाराला धडक
  • पोलिसाच्या अंगावर कार घातली; हवालदाराने उडी मारून बचाव केला
  • पोलिसांचा पाठलाग; २२ वर्षीय चालक वैभव दांडे ताब्यात
 

नाशिक : शहरातील वर्दळीच्या दत्त मंदिर सिग्नल परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव कार चालवणाऱ्या २२ वर्षीय चालकाने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली. यापूर्वी आरोपीने एका महिला दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी पाठलाग करून आरोपी वैभव दांडे याला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

सिग्नल तोडून भरधाव वेगाने कार पळवली

मिळालेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर चौकात वाहतूक पोलीस नियमितपणे वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्याचवेळी आरोपी वैभव दांडे याने भरधाव कार चालवत सिग्नल तोडला. पुढे जात असताना त्याने एका महिला दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर तेथे तैनात असलेल्या पोलिस हवालदाराने आरोपीला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, कार थांबविण्याऐवजी चालकाने वेग आणखी वाढवला.

पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न

आरोपीने कार थेट हवालदाराच्या दिशेने नेल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार अंगावर येत असल्याचे लक्षात येताच हवालदाराने प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आरोपीने कार न थांबवता पुढे नेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तेथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पोलिसावर कार घालण्याचा प्रयत्न झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

हेही वाचा:Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड

पोलिसांचा पाठलाग; चालक ताब्यात

हवालदाराला चुकवून आरोपीने घटनास्थळावरून कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही नागरिकांनीही पोलिसांना मदत केली. अखेर पोलिसांनी आरोपीला कारसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. या घटनेमुळे दत्त मंदिर सिग्नल परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न यांसह विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, महिला दुचाकीस्वाराला झालेल्या धडकेबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच व्हिडीओ आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेचा क्रम तपासला जात आहे.

Web Title: Nashik datta mandir signal car driver attacks traffic police arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Car Accident
  • Nashik Crime
  • Traffic

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
2

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.