Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi mumbai Crime: प्रेमसंबंधातून घडलं धक्कादायक कृत्य; गार्डनमध्ये भेट अन् मोठा ट्विस्ट

नवी मुंबईतील नेरुळ परिसरात अल्पवयीन मुलगा आणि मुलीच्या प्रेमसंबंधातून धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणातील घटनाक्रम ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 25, 2026 | 04:49 PM
Navi mumbai Crime news: प्रेमसंबंधातून घडलं धक्कादायक कृत्य; गार्डनमध्ये भेट अन् मोठा ट्विस्ट

Navi mumbai Crime news: प्रेमसंबंधातून घडलं धक्कादायक कृत्य; गार्डनमध्ये भेट अन् मोठा ट्विस्ट

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलाने प्रेमसंबंध तोडल्यानंतर वादाला सुरुवात झाली.
  • मुलीसह तिच्या आईविरुद्ध नेरुळ पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल.
  • प्रेमसंबंधाचा वाद टोकाला गेल्याने नवी मुंबईत खळबळ.
नवी मुंबई/ crime news: प्रेमसंबंध तोडण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील नेरुळ परिसरात घडली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह तिच्या आईविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे त्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलाने शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर काही काळाने संबंधित मुलीनेही शिक्षण सोडले. मात्र, शिक्षण सोडल्यानंतरही दोघांमध्ये भेटणे आणि बोलणे सुरू होते.

दरम्यान, काही कारणास्तव मुलाने हे प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला. यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. प्रेमसंबंध तोडण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दोघांनी नेरुळमधील एका उद्यानात भेटण्याचे ठरवले.

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

उद्यानातील भेटीत वाद विकोपाला

ठरल्याप्रमाणे दोघे उद्यानात भेटले. यावेळी प्रेमसंबंध तोडण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर अल्पवयीन मुलावर ब्लेडने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या हल्ल्यात मुलाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

हल्ल्यानंतर जखमी मुलाला पाहून त्याच्या मित्रांनी तातडीने मदत केली. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली.

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…

मुलीसह आईविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीसह तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील नेमका घटनाक्रम आणि हल्ल्यामागील कारणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलावर झालेल्या या हल्ल्यामुळे नेरुळ परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संबंधितांकडे चौकशी केली जात आहे.

Web Title: Navi mumbai crime news shocking act stemming from a romantic relationship meeting in the garden and a major twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.