Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांचा थरारक पाठलाग; दुचाकीस्वाराला पकडताच उघडकीस आला चोरीचा खेळ

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र दुचाकीस्वाराने वेग वाढवत पळ काढला... पोलिसांनी पाठलाग करून त्याला अखेर गाठले. दुचाकीची माहिती ई-चालान मशिनवर तपासताच पोलिसांना धक्कादायक सत्य समोर आले; ज्या गाडीवर तो भरधाव धावत होता, ती सायनमधून चोरीला गेलेली निघाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 04, 2026 | 02:02 PM
Navi Mumbai Crime News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांचा थरारक पाठलाग; दुचाकीस्वाराला पकडताच उघडकीस आला चोरीचा खेळ

Navi Mumbai Crime News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांचा थरारक पाठलाग; दुचाकीस्वाराला पकडताच उघडकीस आला चोरीचा खेळ

Follow Us
Follow Us:
  • भरधाव दुचाकीने पळ काढला, पण पोलिसांनी गाठलेच
  • ई-चालान मशिनने उघड केला चोरीच्या दुचाकीचा भांडाफोड
  • आरोपी सायन पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडून भरधाव वेगाने दुचाकी चालवत पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्याला पळस्पे महामार्ग पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत सायन परिसरातून चोरीला गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली. ई-चालान मशिनच्या माध्यमातून दुचाकीची माहिती तपासल्यानंतर तिचा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न

बुधवारी सकाळी सुमारे ११.४१ वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात होता. त्याच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पळस्पे महामार्ग पोलिसांच्या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच त्याने दुचाकीचा वेग वाढवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर आदई ब्रिजजवळ शोल्डर लेनमध्ये पोलिसांनी दुचाकीस्वाराला घेरले आणि त्याला अडवण्यात यश मिळविले.

हेही वाचा: वाईतील मद्यपींची वरात थेट पोलीस ठाण्यात; सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना दणका, पोलिसांची धडक कारवाई

कागदपत्रांबाबत उडवाउडवीची उत्तरे

ताब्यात घेतलेल्या दुचाकीस्वाराची चौकशी केली असता त्याने आपले नाव अरविंद हिरासिंग अडे (वय २७, रा. सांताक्रुज, मुंबई; मूळ रा. यवतमाळ) असल्याचे सांगितले. पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि उडवाउडवीच्या उत्तरांमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

ई-चालानवर दुचाकीचा तपशील तपासला

पोलिस अंमलदारांनी ई-चालान मशिनच्या माध्यमातून दुचाकीच्या क्रमांकाची माहिती तपासली. या तपासात दुचाकी धारावी येथील राधेश्याम विश्वकर्मा यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही दुचाकी सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली असून, याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

हेही वाचा: Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात संतापजनक घटना; सर्व विद्यार्थी उतरल्यावर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा घेतला गैरफायदा

आरोपी सायन पोलिसांच्या ताब्यात

चोरीची दुचाकी जप्त करून आरोपी अरविंद अडे याला पुढील तपासासाठी सायन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सायन पोलीस करत आहेत. महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक त्रिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे केंद्राचे प्रभारी अधिकारी देवीदास नाईक, ड्युटी अधिकारी केदार कुंभार, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, संजयसिंग ठाकूर, प्रकाश म्हात्रे आणि ठाणे अंमलदार मच्छिंद्र जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. ई-चालान मशिनच्या माध्यमातून वाहनाची माहिती तपासल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Navi mumbai crime news thrilling police chase on the mumbai pune expressway two wheeler riders theft racket exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.