Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : विद्यामंदिर की मदिरामंदिर ? शाळेच्या भोवती तळीरामांची जंगी पार्टी; पोलिसांनी गस्त वाढविण्याची होतेय मागणी

दिवाळे कोळीवाड्यातील शाळेला लागून आलेल्या परिसरात खुलेआम रात्रीच्या वेळेस मद्यपीच्या दारू, सिगारेट गांजा अशा जंगी पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 10, 2025 | 12:40 PM
Navi Mumbai : विद्यामंदिर की मदिरामंदिर ? शाळेच्या भोवती तळीरामांची जंगी पार्टी; पोलिसांनी गस्त वाढविण्याची होतेय मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यामंदिर की मदिरामंदिर ?
  • शाळेच्या भोवती तळीरामांची जंगी पार्टी
  • पोलिसांनी गस्त वाढविण्याची होतेय मागणी

नवी मुंबई /सिद्धेश प्रधान: एकीकडे राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.तर दुसरीकडे दिवाळे कोळीवाड्यातील शाळेला लागून आलेल्या परिसरात खुलेआम रात्रीच्या वेळेस मद्यपीच्या दारू, सिगारेट गांजा अशा जंगी पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. यामुळे, सकाळच्या सत्रातील शालेय विध्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दारूच्या नशेत येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून अशा शाळेला लागून असलेल्या खाडी परिसरात गस्त  वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

Solapur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी, वकीलासह पाच जणांविरोधात गुन्हा

दिवाळे गावाच्या दक्षिण बाजूला खाडी किनाऱ्याजवळच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्र.02 व शाळा क्र.117 या दोन शाळा असून, सकाळ आणि दुपारच्या सत्रात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेच्या काही अंतरावर समुद्र किनारा आणि निवांत बसण्याचे ठिकाण असल्याने अंधाराचा फायदा घेत दररोज रात्री उशिरापर्यंत इथे मद्यपिंच्या जंगी पार्ट्या होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे, विध्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता या शाळेत शिकणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काचेच्या बाटल्यांमुळे कोळी बांधवांना इजा होण्याची शक्यता

उशिरापर्यंत पार्ट्या झाल्यानंतर दारुच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ जागेवरच सोडून निघून जात असल्याने परिसरात प्लास्टिक ग्लास, पाण्याच्या बाटल्या, बियर आणि विविध दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच पडलेला असतो. यामुळे विध्यार्थ्यांसह समुद्र किनारी वावरणाऱ्या स्थानिक कोळी बांधवांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी शाळा परिसरात गस्त वाढवून संबंधित दोषींवर कडक कारवाई करून या संदर्भात नियंत्रण आणण्याची मागणी दिवाळे ग्रामस्थांनकडून केली जात आहे.

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

स्वच्छ नवी मुंबईला देखील गालबोट

नवी मुंबई पालिकेकडून सातत्याने नागरिकांना अनेकदा मद्यपी ग्रुपसह या भागात येतात. सध्या बारमध्ये मद्यपान करण्याचे दर वाढल्याने अनेक मद्यपी शांत परिसर शोधून तिथे मद्य विकत घेऊन मद्यपान करताना आढळलं आहेत. अशा अनेक जागांवर पोलिसांचा वॉच आहे. मात्र दिवाळे गावातील समुद्र किनाऱ्यावर देखील अशा मद्यपिनी आपले हक्काचे स्थान तयार केले असून, अनेकजण गुपसोबत मद्य पिण्यासाठी येत असतात. मुख्य म्हणजे दारूच्या नशेत अनेकदा मद्याच्या बाटल्या, त्यासोबत आणलेले खाद्यपदार्थ, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या तिथेच टाकून देतात. किनाऱ्यावर सकाळी हा कचरा दिसून येतो. तर अनेकदा दारूच्या नशेत या बाटल्या समुद्रात भिरकावल्या जातात. हाच कचरा नवी मुंबईच्या स्वच्छता मोहिमेला देखील अडसर ठरत आहे. तर दुसरीकडे समुद्रातील कचरा कांदळवनाता जाऊन अडकत आहे. त्यामुळे जलचक्र धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या मद्यपीमुळे नवी मुंबईतील स्वच्छतेला गालबोट लागण्याची शक्यता आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमची रात्री गस्त सुरू असते. मात्र दिवाळे खाडी किनारी अनेक अनुचित प्रकार घडत आल्या अधिक गस्त घालण्यात येईल. आम्ही नियमित गस्त घालून अशा उघड्यावर मद्य पिणाऱ्यांवर कारवाई करत असतो. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी ते आमच्या निदर्शनास आणून द्यावेत. आम्ही तडक त्यावर कारवाई करू.दिवाळे गावात ही कारवाई सुरू राहील, असं एनआरआय पोलिस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितलं आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यामंदिर की मदिरामंदिर ?

    Ans: एकीकडे राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.तर दुसरीकडे दिवाळे कोळीवाड्यातील शाळेला लागून आलेल्या परिसरात खुलेआम रात्रीच्या वेळेस मद्यपीच्या दारू, सिगारेट गांजा अशा जंगी पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. यामुळे, सकाळच्या सत्रातील शालेय विध्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दारूच्या नशेत येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून अशा शाळेला लागून असलेल्या खाडी परिसरात गस्त  वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

  • Que: नेमकं प्रकरण काय ?

    Ans: दिवाळे गावाच्या दक्षिण बाजूला खाडी किनाऱ्याजवळच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्र.02 व शाळा क्र.117 या दोन शाळा असून, सकाळ आणि दुपारच्या सत्रात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेच्या काही अंतरावर समुद्र किनारा आणि निवांत बसण्याचे ठिकाण असल्याने अंधाराचा फायदा घेत दररोज रात्री उशिरापर्यंत इथे मद्यपिंच्या जंगी पार्ट्या होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे, विध्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता या शाळेत शिकणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • Que: पोलिसांची भूमिका काय ?

    Ans: पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमची रात्री गस्त सुरू असते. मात्र दिवाळे खाडी किनारी अनेक अनुचित प्रकार घडत आल्या अधिक गस्त घालण्यात येईल. आम्ही नियमित गस्त घालून अशा उघड्यावर मद्य पिणाऱ्यांवर कारवाई करत असतो. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी ते आमच्या निदर्शनास आणून द्यावेत. आम्ही तडक त्यावर कारवाई करू.दिवाळे गावात ही कारवाई सुरू राहील, असं एनआरआय पोलिस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितलं आहे.

Web Title: Navi mumbai vidya mandir or madira mandir talirams wild party around the school demand to increase police patrols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी
1

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन
2

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

Navi Mumbai : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट; शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद, उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना
3

Navi Mumbai : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट; शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद, उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी
4

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.