Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Navi Mumbai Building Collapse News: तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने २० विद्यार्थी अडकले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 09:29 PM
कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला

Follow Us
Follow Us:

 

  • कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला
  • 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू,
  • 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका
सावन वैश्य / नवी मुंबई – : कोपरखैरणे सेक्टर 2 येथील २५ ते २८ वर्ष जुन्या विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने २० विद्यार्थी अडकले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून १२ विद्यार्थी आणि एक शिक्षिका यांची अग्निशमन दलाने सुरक्षित सुटका केली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने डाव घेत परिसराची पाहणी केली. तर महापौर सुजाता पाटील तसेच शिवसेनेचे नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी देखील रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर २, प्लॉट क्रमांक १२ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये घडली. तळमजल्यावर विद्यार्थ्यांचा घरगुती क्लास सुरू असताना अचानक पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन तसेच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

अग्निशमन विभागाने एकूण १२ विद्यार्थी आणि एक शिक्षिका अशा १३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना अपेक्स हॉस्पिटल, काहींना साई स्नेहदीप हॉस्पिटल तर एका विद्यार्थ्याला नवी मुंबई महानगरपालिका वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनीष मसे (वय १४) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाकडून देण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना देखील व्यक्त होत आहे. दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण काय याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :

बचाव कार्यात सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये सिद्धांत गुप्ता (८), प्रिन्स सोनी (११), आयशा, कुसुम (१५), निष्का धनवाडे (१४), आराध्या बोडसे (१४), तन्वी श्रीवास्तव (७), देवांश पुजारी (१२), राजदीप वानखेडे (१०), पार्थ खैरनार (१४), रुद्र येलूरकर (५) आणि शिक्षिका शामली चौधरी (५३) यांचा समावेश आहे.

नवी मुंबईत अनेक जुन्या इमारती धोकादायक अवस्थेत

नवी मुंबई शहरात कोपरखैरणेच नव्हे तर विविध नोड्समध्ये अनेक जुन्या इमारती सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र आहे. विशेषतः वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, सीबीडी बेलापूर, सानपाडा, तुर्भे आणि ऐरोली परिसरातील काही इमारती २० ते ३० वर्षे जुन्या झाल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या इमारतींमध्ये भेगा पडणे, स्लॅब कमकुवत होणे, प्लास्टर कोसळणे अशा घटना अधूनमधून घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी महापालिकेने इमारतींना धोकादायक म्हणून नोटिसा देखील बजावल्या आहेत. मात्र पुनर्विकास रखडणे, रहिवाशांमध्ये एकमत नसणे आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी वेळेत होत नाही. इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाने नियमित स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

Web Title: Slab collapses in vidya bhavan society in koparkhairane 14 year old student dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • crime news
  • Navi Mumbai
  • slab collapsed

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.