Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

गाडी चालवणे, पोलीसांच्या सोबत त्यांच्या हद्दीत फिरणे, पोलीस ठाण्यात येणाऱ्या पाहुण्यांना पाणी-चहा देणे, तसेच विविध किरकोळ कामे करणे अशी अनेक कामे काही खाजगी व्यक्ती करत असल्याचे दिसून येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 06, 2026 | 04:47 PM
पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार?
  • नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
  • पोलीसांच्या सोबत त्यांच्या हद्दीत फिरणे
सावन वैश्य | नवी मुंबई : शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये खाजगी व्यक्ती पोलीसांच्या कामात सहभागी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गाडी चालवणे, पोलीसांच्या सोबत त्यांच्या हद्दीत फिरणे, पोलीस ठाण्यात येणाऱ्या पाहुण्यांना पाणी-चहा देणे, तसेच विविध किरकोळ कामे करणे अशी अनेक कामे काही खाजगी व्यक्ती करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही पद्धत नेमकी कधी थांबणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माहितीनुसार, काही पोलीस ठाण्यांमध्ये हे खाजगी लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवस-रात्र पोलीस ठाण्यातच वावरत असतात. काही वेळा ते अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाड्या धुणे, गाडीतून, साहेबांचा गाडी चालवणे, सामान आणणे, साहेबांसाठी जेवण आणणे अशी कामे करत असल्याचेही सांगितले जाते.

भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

काही ठिकाणी या व्यक्तींना ‘पोलीस मित्र’ अशी ओळख दिली जात असल्याचेही समोर आले आहे. मात्र हे लोक नेमके कोण आहेत, त्यांची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच त्यांना कोणत्या अधिकारावर पोलीस ठाण्यांमध्ये वावर करण्याची परवानगी दिली जाते, याबाबत स्पष्टता नाही. या व्यक्तींवर होणारा खर्च कोण करतो—संबंधित अधिकारी-कर्मचारी की शासन—हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नुकताच खारघर परिसरातील निर्भया पथकाच्या वाहनासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कथितपणे एका खाजगी व्यक्तीकडून पोलीस वाहन चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस ठाण्यांमध्ये खाजगी व्यक्तींच्या सहभागाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

काही नागरिकांचे म्हणणे आहे की, काही वेळा हे खाजगी व्यक्ती ‘कलेक्टर बॉय’ किंवा मदतनीस म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांची वैयक्तिक कामेही करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करावी आणि स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे अशा खाजगी व्यक्तींची माहिती घेणार का आणि ही परंपरा थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलली जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Crime News: मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

Web Title: When will the private individuals tradition in police stations end question mark from citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबई हादरली! वाढदिवसाच्या व्हिडिओसाठी रस्त्यावर लावली आग; कार डीलर पोलिसांच्या ताब्यात
1

Mumbai Crime: मुंबई हादरली! वाढदिवसाच्या व्हिडिओसाठी रस्त्यावर लावली आग; कार डीलर पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur Crime: कोल्हापुरात संतापजनक घटना! तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; मुख्य आरोपी अटकेत
2

Kolhapur Crime: कोल्हापुरात संतापजनक घटना! तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; मुख्य आरोपी अटकेत

Mumbai Crime: अंधेरीत थरारक हत्याकांड!  ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?
3

Mumbai Crime: अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?

चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य
4

चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.