crime (फोटो सौजन्य: social media)
भांडारा जिल्ह्यातील साकोली येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका १५ दिवसीय नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील तयार करण्यात आला आहे. या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या हे बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये एका बालकाचा जन्म झाला होता. हा बाळ १५ दिवसाचा असतांना त्याची ७० हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. ही विक्री अवैध असल्याने याची १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर तयार करण्यात आला. या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा करण्यात आला. एवढंच नाही तर प्रसूती भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झाल्याचं दस्तावेज तयार करून नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आलं. या सर्व प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती. ही तक्रार भंडारा येथील बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांना प्राप्त होताच त्यांनी चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.
या संपूर्ण गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी चौकशीअंती या गंभीर प्रकरणाची तक्रार साकोलीच्या पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे. राज्यपाल रंगारी (47), सुचिता रंगारी (44), अजित टेंभुर्णे (35), सोनाली टेंभुर्णे (25), नंदकिशोर मेश्राम (45), राकेश टेंभुर्णे (32), पुष्पलता रामटेके (50) असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता हा बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात आहे. त्याला एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे.
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
दरम्यान, राज्यात अनेक गुन्हे वाढत चालले असून घरफोड्यांच्या गुन्हे जास्तीती जास्त नोंद करण्यात येत आहे. वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
Panvel News : नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोची मोठी कारवाई; मंगला एक्स्प्रेसमधून 35 कोटींचे ड्रग्स जप्त