भंडाऱ्यात अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला. दुचाकीवरून पडल्याने बिबट्या पळून गेला. विद्यार्थी बचावला, मात्र परीक्षा चुकल्याने वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
भंडाऱ्यात एका भोंदूबाबाने प्रेमविवाह करून पळून गेलेल्या मुलीला परत आणण्याचे आमिष दाखवत तिच्या वडिलांकडून १.०८ लाख रुपये उकळले. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात लग्नास नकार दिल्याने संतप्त दिराने 32 वर्षीय वहिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही घटना 8 वर्षीय मुलीसमोर घडली असून आरोपी फरार आहे.
भंडाऱ्यात एसटी डेपो परिसरात बसने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पाण्याच्या कॅनसाठी गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भंडाऱ्यातील साकोली परिसरात वाघाच्या हल्ल्यांनी 15 दिवसांत 2 जणांचा बळी घेतला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभाग प्रयत्न करत असला तरी वाघ अद्याप जेरबंद झाला नाही.
एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने 10 दिवसांच्या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केल्याचा आरोप आहे. प्रकरणी पाच जणांवर गुन्हा, एक महिला अटकेत तर मुख्य…
तुमसर तालुक्यात चित्रपट पाहताना पत्नीच्या जवळ न बसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नीने पतीवर चाकूने वार केला. शिक्षक असलेले पती जखमी झाले असून पोलीस तपास सुरू आहे.
भंडाऱ्यात संपत्ती मिळवण्याच्या लालसेपोटी जावई अमित लांजेवारने मित्राच्या मदतीने सासरे किशोर कंगाले यांची निर्घृण हत्या केली. रस्त्यात अडवून गळा दाबून खून करून मृतदेह पुलाखाली लपवण्यात आला. दोन्ही आरोपी अटकेत आहेत.
किशोर आणि अमित यांच्यात संपत्तीवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. जावयाच्या भीतीने किशोर मागील आठ महिन्यांपासून कोकणागड येथील पुतणे मंगेश कंगाळे यांच्या घरी राहत होते.
पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पतीला पाहून स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमी पुरुषोत्तम कुंभलवार यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
भंडाऱ्यात आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन जणांना अटक करण्यात आली असून बनावट लेटर व शिक्के जप्त करण्यात आले.
भंडाऱ्यात पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली. दारूच्या नशेत वाद वाढल्याने आरोपी नारायण मेश्रामने नरेश दुनेदारला तळ्यात बुडवून ठार केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे…
समीर मेश्राम याने त्याला अडविल्यावर आरोपीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. प्रमिला मेश्राम यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. हे पाहून संदीप मेश्राम याने भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला.
भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ती गर्भवती राहिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय…
भंडाऱ्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मावस भावाकडून अत्याचार व मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी मिळाल्यामुळे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे…
भंडाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरु होती. त्यातून शनिवारी (९ ऑगस्ट) दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका ॲकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढंच नाही तर त्यानं तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ देखील केलं.