
jhiram naxal attack
२५ मे २०१३ रोजी काँग्रेसच्या ‘परिवर्तन यात्रे’दरम्यान बस्तरमधील झीरम घाटीत नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचा एकूण २९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील सर्व दोषी सध्या जगदलपूर येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. शिक्षेची घोषणा होतेवेळी आरोपींचे नातेवाईक न्यायालयाबाहेर उपस्थित होते. या निर्णयामुळे सुमारे १३ वर्षांनंतर या भीषण आणि रक्तरंजित हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांना अखेर मोठा न्याय मिळाला आहे.
दोषी ठरवण्यात आलेले आरोपी: १. प्रमिला मोडियाम (महिला) २. सुमित्रा पुनेम (महिला) ३. महादेव नागा (महिला/आरोपी) ४. मुक्का मांडवी ५. मड़कामी देवा ६. कोसा कवासी ७. आयत मरकाम ८. बंजामी सेना ९. चैतू लेकाम १०. जोगा मड़कामी.
बातमी अपडेट होत आहे…