Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत अखेर ‘त्या’ कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 700 हून अधिक CCTV तपासले अन्…

पिंपरी कॅम्पात १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास ओमकार जनरल स्टोअर्स येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या संशयिताने दुकानात येत हिंदीतून 'दस वाला फ्रुटी दे!' असे म्हणत व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत धमकावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2025 | 12:05 PM
पिंपरी गोळीबार प्रकरणातील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

पिंपरी गोळीबार प्रकरणातील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ परिसरात भरदिवसा दुकानात घुसून व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरी करणारा आणि गुन्हा करताना गोळीबार करून पसार झालेला संशयिताला अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सातशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या.

रवींद्र भाऊसाहेब घारे (वय ४०, रा. चिखली, मूळगाव ओझर्डे, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्पात १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास ओमकार जनरल स्टोअर्स येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या संशयिताने दुकानात येत हिंदीतून ‘दस वाला फ्रुटी दे!’ असे म्हणत व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत धमकावले आणि गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने ओढून घेतली. तसेच गोळी झाडून व्यावसायिकाला जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या १० पथकांची स्थापना केली. अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे व मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक पांडुरंग देवकाते, दतात्रय गुळीग यांच्या पथकाने संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पाच दिवस सातशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.

संशयिताने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा केला. त्याने मोबाईलचा वापर केला नाही. चेहरा लपवण्यासाठी हेल्मेट व रेनकोटचा वापर केला. त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला. पिंपरी येथून पळून जाताना त्याने पाच ठिकाणी दुचाकी बदलल्या. त्यासाठी शिरगाव पोलिस ठाण्याच्या तसेच हद्दीत तसेच वडगाव मावळ येथे दुचाकी चोरी केली. ठराविक अंतर गेल्यानंतर चोरी केलेली दुचाकी तेथेच सोडून दुसरी दुचाकी चोरून त्यावरून तो चिखली येथे आला.

हेल्मेट आणि चप्पलवरून मिळाला ‘क्ल्यू’

घटनेनंतर पिंपरी कॅम्पातून पळून जाताना रवींद्र घारे याने रस्त्यात रेनकोट काढला. तसेच पाच दुचाकी बदलवल्या. मात्र, त्याने हेल्मेट काढले नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दुचाकी बदलली तरी त्याने घातलेले हेल्मेट आणि चप्पल यावरून फुटेजची पाहणी करून पोलिसांनी मागोवा घेतला. दरम्यान, चिखली येथे त्याने हेल्मेट काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. चिखलीतून ६ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, ११ जिवंत काडतुसे, १० ग्रॅमची सोनसाखळी, दोन दुचाकी जप्त केल्या.

गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य

बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रवींद्र घारे फरार होता. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीचा तो सक्रिय सदस्य असल्याचेही निष्पन्न झाले असून, त्याच्यावर यापूर्वी दोन वेळा ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झालेली आहे.

Web Title: Notorious criminal ravindra ghare arrested by pimpri police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
1

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली
2

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार
3

Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
4

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.