महिलांवर पैसे खर्च करण्यासाठी म्हातारा करायचा चोरी, पोलिसांनी पकडले रंगेहात (फोटो सौजन्य-एएनआय)
‘दिल तो बच्चा है जी’ हे लोकप्रिय बॉलिवूड गाणे तुम्ही ऐकले असणार. हे गाणं मध्य प्रदेशातील इंदूरमधून पकडलेल्या एका वृद्ध चोरावर हे अगदी तंतोतंत बसतं. कारण हा ज्येष्ठ नागरिक आपली संपत्ती मुलींवर लाटण्यासाठी चोरी करायचा. मात्र इंदूर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक (६२ वर्षी) वृद्धाला आणि त्याच्या साथीदाराला रंगेहात पकडून अटक करण्यात आली.
हा ज्येष्ठ नागरिक मुलींवर पैसे खर्च करण्यासाठी चोरीच्या अनेक घटना घडवत असे. गेल्या काही दिवसांपासून अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर पोलिसांनी 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. त्यानंतर पोलिसांनी 62 वर्षीय मुकेश आणि 40 वर्षीय आरोपींना अटक केली. या अटकेनंतर पोलिसांना या दोघांकडून मालमत्ता ही जप्त केली.
62 वर्षीय मुकेशची महिलांशी असलेल्या मैत्रीमुळे प्रचंड खर्च वाढला होता. मग हा खर्च भागवण्यासाठी मुकेश चोरी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना आरोपी वृद्धाच्या मोबाईलमधून अनेक महिलांचे फोन नंबर आणि फोटोही सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून हे फोन नंबर आणि फोटो तपासण्याचे काम सुरु केले आहे.
डीसीपी हृषिकेश मीणा यांनी सांगितले की, पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, ते ऑटो रिक्षा चालवून रेस करायचे आणि त्यानंतर ते चोरीच्या घटना करायचे. वृद्ध चोरट्याची व त्याच्या साथीदाराची चौकशी केल्यानंतर चोरीच्या आणखी अनेक घटना उघड होऊ शकतात. या वयात एखाद्या व्यक्तीने इतक्या घटना केल्या असतील, तर आणखी अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्यालाही या गोष्टींबाबत विचारणा होणार आहे.