Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

आरोग्य विभागाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी डॉक्टरसह एजंटला अटक केली असून, त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 01:18 PM
चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी (पाचंगेवस्ती) येथील एका क्लिनिकमध्ये मोबाईल ॲपच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. आरोग्य विभागाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी डॉक्टरसह एजंटला अटक केली असून, त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद), डॉ. आकाश सुभाष मालगुंडे (वय ३५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना एका व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या युनिट सातचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने यासंदंर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले व ग्रामीण रुग्णालय शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांना याची माहिती दिली. तसेच, संयुक्तरित्या कारवाई सुरू केली.

हेदेखील वाचा : Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘डमी’ रुग्णासह पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात पोहोचले. तेथे एजंट नरेंद्र ठाकरे हा डमी रुग्णांना भेटला. त्याने या दोघा डमी रूग्णांना स्वत:च्या कारमधून घेत थेट डोकसांगवी येथील डॉ. मालगुंडे याच्या लाईफ केअर रुग्णालयात आणले. त्याठिकाणी त्यांना आत नेऊन मोबाईल अॅपद्वारे त्यांची गर्भ निदान चाचणी करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पोलिसांच्या व जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने रुग्णालयात छापा टाकला. तेव्हा मोबाईल ॲपला जोडलेल्या उपकरणाद्वारे सोनोग्राफी करताना आढळून आले.

साहित्यांसह औषधांचा साठा जप्त

दुसरीकडे, तपासणीदरम्यान गर्भलिंग निदानासंदर्भातील साहित्य तसेच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला. पंचनामा करून साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गर्भलिंग निदान करणे व करवून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारांची माहिती तत्काळ आरोग्य विभाग किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Gender detection through mobile app shocking incident in shirur pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • crime news
  • Shirur News

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.