Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

या अपघाताचे वृत्त समजताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करून जखमी व मृतदेह बाहेर काढला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 03:19 PM
हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

पुरुषोत्तम शेट्ये हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत
नडगिवे धुरीभाटलेवाड़ी बसस्टॉपजवळ मंगळवारी कार व ट्रकचा अपघात
18 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

कणकवली: खारेपाटण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे धुरीभाटलेवाड़ी बसस्टॉपजवळ मंगळवारी कार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात खारेपाटण जिजामातानगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. होळी आणि शिमग्याच्या (Sindhudurga) सणादिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे खारेपाटण परिसरात शोककळा पसरली आहे.

पुरुषोत्तम शेट्ये हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्याना तनिषा व ऋतुपर्ण ही त्यांची दोन मुले आहेत. होळी सणाच्या निमित्ताने खारेपाटण येथे ऋतूपर्ण हा घरी आला व घरातील जुनी अँबेसिडर कार घेऊन खारेपाटण येथून तळेरेच्या दिशेने निघाला होता. परंतु, नडगिवे धुरी भाटलेवाडी बसस्टॉपजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड ट्रकला त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. संबंधित ट्रकचे चालक गणेश शशिकांत पाष्टे घरी जेवणासाठी गेले होते. तेवढ्यात हा अपघात झाला. या अपघातात कारमधील तनिषा हिचे जागीच मृत्यू झाला. चालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

या अपघाताचे वृत्त समजताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करून जखमी व मृतदेह बाहेर काढला. खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद देसाई, हवालदार अवधूत गुणीजन, हवालदार चंद्रकांत झोरे, श्री. कदम तसेच वन विभागाचे विजय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे चित्र अधोरेखित होत आहे.

ट्रक अपघात चालक ठार

मुंबईहून गोव्याच्या – दिशेने जाणाऱ्या ट्रक मुंबई गोवा महामार्गा लगतच्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन यात – महामार्गावर पलटी झाला. केबिनखाली चिरडून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी – पाऊणच्या सुमारास धनावडे शेती फार्मसमोर हा अपघात घडला.

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

ट्रक चालक जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा. शेख, टिंबो कोली वास, ता. – अंजार, जि. कच्छ, गुजरात) आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (जीजे. १२ बीझेड २९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. ट्रक लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर आला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडकला. धडकल्यानंतर ट्रक पलटी होऊन चालकाचा केबिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवकन्या अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: 18 years old minor girl death in truck car accident kankvli marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
1

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली
2

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
3

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज
4

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.