Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत बनावट चलन पाठवले जाते. संबंधित एपीके फाईल डाऊनलोड करताच मोबाईलवरील संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 01:41 PM
'पीएम नवीन योजना'च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

'पीएम नवीन योजना'च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : इंदापूर शहरात सायबर फसवणुकीच्या प्रकारांनी धोकादायक वळण घेतले असून, विविध आमिषांद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. दाम दुप्पट करून देण्याचे आश्वासन, शेअर मार्केटमध्ये पैसे वाढवून देण्याचा दावा अशा जुन्या पद्धतींबरोबरच आता ‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत बनावट चलन पाठवले जाते. संबंधित एपीके फाईल डाऊनलोड करताच मोबाईलवरील संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. मोबाईलमधील डेटा, फोटो, बँकिंग माहिती चोरीला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याचबरोबर हॅक केलेल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना “माझ्या यूपीआय सर्व्हरमध्ये समस्या आहे, मला तातडीने काही रुपयांची मदत हवी आहे, काही तासांत परत करतो” अशा आशयाचे मेसेज पाठवले जात आहेत. संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा समज करून अनेकांकडून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

दरम्यान, अलीकडेच इंदापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही या सायबर जाळ्याचा फटका बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनोळखी लिंक किंवा एपीके फाईल डाऊनलोड न करता, कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी थेट फोनवर खात्री करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुण्यात ज्येष्ठ वकिलाची फसवणूक

पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ असलेल्या वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपयांना गंडा घातला आहे. पुणे शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हेदेखील वाचा : Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक

Web Title: Apk file sent under the name of pm naveen yojana and fraud committed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Indapur Crime

संबंधित बातम्या

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल
1

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी
2

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ
3

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण
4

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.