Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhpur Crime: पन्हाळा पोलिसांची २४ तासांत कारवाई; वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधणारे कापड ठरले महत्त्वाचा पुरावा

महाडिकवाडीत वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधून पाच लाखांचे दागिने लुटल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, मोबाईलमधील ‘फोन पे’ व्यवहार आणि कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजने तपासाला असा धागा मिळाला की, अवघ्या २४ तासांत चोरीचा उलगडा झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 04:56 PM
Kolhpur Crime: पन्हाळा पोलिसांची २४ तासांत कारवाई; वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधणारे कापड ठरले महत्त्वाचा पुरावा

Kolhpur Crime: पन्हाळा पोलिसांची २४ तासांत कारवाई; वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधणारे कापड ठरले महत्त्वाचा पुरावा

Follow Us
Follow Us:
  • ८० वर्षीय वृद्धेचे हात-तोंड बांधून पाच लाखांचे दागिने लुटले
  • ‘फोन पे’ अन् सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपींचा धागा
  • दोघांना अटक; पाच तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत
पन्हाळा : महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधून पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याच्या प्रकरणाचा पन्हाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. मोबाईलमधील ‘फोन पे’ व्यवहार आणि कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यामुळे पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. या प्रकरणी नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८, दोघे रा. महाडिकवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

मध्यरात्री घरात प्रवेश

महाडिकवाडी येथील सरदार ऊर्फ बापू महाडिक यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. घरातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड व हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून तिच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली होती. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Jalgaon Crime News: जळगाव हादरले!बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह; मैत्रीतील वादातून खुनाचा संशय

स्थानिकांवर संशय

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरासह आजूबाजूच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गुन्ह्याच्या वेळी कोणतीही संशयित गाडी किंवा बाहेरील व्यक्ती परिसरात आल्याचे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय स्थानिक व्यक्तींकडे वळला.

‘फोन पे’ व्यवहाराने दिला धागा

तपासादरम्यान मिळालेल्या स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदकिशोर महाडिक याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने गुन्ह्यातील सहभाग नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधील व्यवहारांची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी ७ सप्टेंबर रोजी एका कापड दुकानात ‘फोन पे’द्वारे पैसे अदा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कापडाच्या साम्याने उलगडा

यानंतर पोलिसांनी संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंदकिशोरने दुकानातून खरेदी केलेले कापड आणि चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड यामध्ये साम्य असल्याचे तपासात आढळले. हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरला. उपलब्ध पुरावे समोर ठेवल्यानंतर नंदकिशोरने रमेश महाडिक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:Pune News: केंद्रीय मंत्री मोहोळांच्या सुरक्षा ताफ्याला भरधाव दुचाकीचा कट; ३२ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

पाच तोळे सोने हस्तगत

त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडिक यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत.

पोलिस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले आणि अमर चव्हाण यांच्या पथकाने तपासात सहभाग घेतला.

Web Title: Panhala mahadikwadi robbery phonepe cctv two arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.