Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रांजणगावात खळबळ! महिला आणि दोन चिमुकल्यांचा सापडला अर्धवट जळालेला मृतदेह, हातावर ‘जयभीम’….

एका महिलेचा आणि दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने रांजणगावात खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मृतदेहाचे बहुतांश भाग जळाल्याने हे मृतदेह कोणाचे आहेत हे समजणे कठीण झालेले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2025 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: pinterest)

crime (फोटो सौजन्य: pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा आणि दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रांजणगावात एकाच खळबळ उडाली आहे. पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे. रांजणगाव खंडाळे परिसरातील अहिल्यानगर महामार्गाजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला रविवारी सकाळी अर्धवट जळालेले हे तीन मृतदेह सापडले. या महिलेची आणि तिच्या लहान मुलांची हत्या झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपी हत्यारा कोण याचा शोध पोलीस घेत आहे.

Palghar News: बॉयफ्रेंडसोबत ‘ती’ जेवायला गेली अन् बिर्याणी खाल्ली, घशात अडकलं चिकनचं हाड; बॉयफ्रेंडसमोरच गर्लफ्रेंडचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या तिन्ही मृतदेहाचा बारसचा भाग जाळला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. महिलेचे अंदाजित वय २५ असावे आणि तिच्यासोबतचे दोन मुलांचे वय चार आणि दीड वर्षे असावे. बहुतांश भाग या तिन्ही मृतदेहाचे जाळले असले तरी महिलेच्या हाताचा काही भाग शिल्लक राहिला होता. फॉरेन्सिक पथकाकडून या सगळ्या अवशेषांची तपासणी करण्यात आली तेव्हा महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू गोंदवला असल्याचे निदर्शनास आले. यावरुन आता पोलिसांना या महिलेची आणि तिच्या मुलांची ओळख पटवण्याचे कठीण काम करावे लागणार आहे.

या महिलेला तिच्या नवऱ्याने किंवा अज्ञात व्यक्तीने ठार मारून जाळल्याचा अंदाज आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सध्या पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या तपासातून आता काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या तिघांना मारून याठिकाणी आणण्यात आले असावे. यानंतर तिन्ही मृतदेहांवर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. मात्र पाऊस असल्याने आग विझवल्याने मृतदेहाचे काही अवशेष शिल्लक राहिले. मुख्य महामार्गापासून २०० मीटर अंतरावर हे अर्धवट जळालेले मृतदेह सापडले आहेत. हा भाग महामार्गाला लागून असल्याने पोलिसांना सीसीटीव्ही किंवा अन्य कोणत्या मार्गाने या हत्येचे धागेदोरे मिळू शकतात. या मृतदेहांचे आता शवविच्छेदन केले जाणार आहे. आई आणि मुलांना जिवंतपणीच जाळले की त्यांना ठार मारून नंतर त्यांचे मृतदेह जाळण्यात आले, याचा उलगडा शवविच्छेदन चाचणीतून होणार आहे.

पुण्यातील मंगळवार पेठेत गोळीबार; दोघे दुचाकीवरुन आले अन्…

Web Title: Panic in ranjangaon partially burnt bodies of a woman and two children found jai bhim written on their hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • crime
  • Murder
  • Pune

संबंधित बातम्या

Mumbai Crime:  45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना
1

Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?
2

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू
3

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार
4

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.