
Cyber Fraud News: फेसबुकवरून स्वस्तात साडी खरेदी करणे पडले महागात; ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची साडेआठ लाखांची फसवणूक!
कलावती बाळासाहेब खरबड (वय ७१) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका साड्यांच्या कलेक्शनची आकर्षक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीतील संपर्कावर कॉल करून त्यांनी अवघ्या ६०० रुपयांत दोन साड्यांची ऑर्डर नोंदवली होती.
ठरल्याप्रमाणे काही दिवस उलटूनही साड्या न आल्याने कलावती यांनी संबंधित क्रमांकावर विचारणा केली. त्यावेळी समोर असलेल्या अज्ञात आरोपीने त्यांचे पार्सल अडकल्याचे सांगत जीएसटी आणि इतर कायदेशीर शुल्काच्या नावाखाली पैशांची मागणी सुरू केली. आरोपीने वेगवेगळ्या बहाण्यांनी आणि विश्वासात घेऊन वृद्धेला वेळोवेळी आपल्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ६४ हजार ९२४ रुपये ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडले.
केवळ सात-आठशे रुपयांच्या साड्यांसाठी भामट्याने साडेआठ लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याने आणि सतत पैशांची मागणी चालू राहिल्याने मुख्याध्यापिकेला घातलेला प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सायबर भामटा नेमका कोण आहे, त्याने यापूर्वी किती जणांना गंडा घातला आहे, त्याच्या गुन्हेगारी पद्धतीचा वापर कसा होतो आणि लाटलेले पैसे कुठे वळवले जातात, याचा कसून शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कलावती बाळासाहेब खरबड यांच्यासोबत ही घटना घडली आहे.
Ans: फेसबुकवर साड्यांच्या ऑर्डरची जाहिरात पाहून ६०० रुपयांना साड्या मागवल्यानंतर, पार्सल अडकल्याचे सांगून जीएसटी आणि इतर चार्जेसच्या नावाखाली ८ लाख ६४ हजार रुपये उकळले.
Ans: या प्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून तपास करत आहेत.