हडपसर भागात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळेल असे एका व्यक्तीला आमिष दाखवून तब्बल ६३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधून समोर आली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली १५० हून अधिक नागरिकांची तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ग्लोबल सायबर क्राईम राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. धनंजय देशपांडे यांनी ऑनलाईन सायबर क्राईम धोके आणि सावधानता' या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.
सायबर चोरट्यांनी एका आयटी इंजिनिअर दाम्पत्याला अवघ्या सात दिवसात सव्वा कोटींना गंडा घातला आहे. त्यांना टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत चोरट्यांनी फसवले आहे.
सक्त वसुली संचनलयाकडून (ईडी) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात एका 52 वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका महिलेची सायबर चोरट्यानी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचा अधिकारी तसेच पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिक भाड्याने गाडी बुक करण्याची प्रक्रिया करत असताना सायबर चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराड शहर परिसरातील गजानन हौसिंग सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
मुकूंदनगर तसेच बिबवेवाडीतील दोन तरुणांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.