Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: अडीच लाखांची बोली लावून आणली नवरी; तिसऱ्याच दिवशी जेवणातून विष देण्याचा प्रयत्न…

अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून लग्नासाठी आणलेली नवरी सासरच्या घरात आल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी धक्कादायक कट रचल्याचा आरोप आहे. जेवणात उंदीर मारण्याचे विष कालवून पतीसह कुटुंबातील तिघांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. ऐवज आणि पैसे घेऊन पसार झालेल्या दोन तरुणींना पारोळा पोलिसांनी काही तासांतच धुळे सीमेवर पकडले

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 04:16 PM
Crime News: अडीच लाखांची बोली लावून आणली नवरी; तिसऱ्याच दिवशी जेवणातून विष देण्याचा प्रयत्न...

Crime News: अडीच लाखांची बोली लावून आणली नवरी; तिसऱ्याच दिवशी जेवणातून विष देण्याचा प्रयत्न...

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सासरच्यांना जेवणातून विष देण्याचा प्रयत्न
  • पैसे-ऐवज घेऊन पसार झालेल्या दोन तरुणी धुळे सीमेवर अटकेत
  • पारोळा पोलिसांची काही तासांतच कारवाई
 

जळगाव : लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबातील तिघांना जेवणातून उंदीर मारण्याचे विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पैसे आणि ऐवज घेऊन पसार झालेल्या दोन तरुणींना पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून अटक केली आहे. या प्रकरणी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील यांचा विवाह सुमन सहाणी हिच्याशी झाला होता. मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाख रुपयांची बोली लावून परराज्यातून ही नवरी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: अचानक खाली पडला तरुण; प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचवला जीव, उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?

जेवणातून विष देण्याचा आरोप

विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच हा धक्कादायक प्रकार घडला. 9 ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद पाटील आणि आई सरलाबाई यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमागे सुमन सहाणी आणि आरती पटेल या दोघींचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. जेवणातून विषारी पदार्थ देऊन कुटुंबातील तिघांना संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही महिला पैसे आणि ऐवज घेऊन तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वेल्हाणेच्या पोलीस पाटलांकडून या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दोन्ही संशयित महिलांचा माग काढत पोलिसांनी काही तासांतच त्यांना धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.

Web Title: Parola velhane newly married woman poisoned food two women arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • Fake Marriage Promise
  • food poisoning news
  • married woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.