crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
डोंबिवली येथून एक मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून १०० हुन अधिक सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ (Phoenix Investment) प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपी फरार आहे त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट
काय आहे प्रकरण?
‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल.एल.पी.’ या नावांनी भागीदारी संस्था सुरु करण्यात आली. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा नफा आणि आकर्षक बोनस स्कीम्सचे खोटे आश्वासन देण्यात आले. सुसरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना थोडाफार नफा देण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला. विश्वास बसल्यानंतर लोकांनी मोठ्या रकमा गुंतवल्या, पण नंतर आरोपींनी मूळ रक्कम आणि कोणताही परतावा देणे पूर्णपाने थांबवले. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
गुंतवणूकदारांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाल्याने या संदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात सुमारे ८० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेल्याने या गुन्हयाचा तपास ठाणे EOW कडे वर्ग करण्यात आला आहे. EOW च्या टीमने तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करून या चार मुख्य आरोपींना अटक केली. गौरव भागत, विकीन पाटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी त्याला अटक केली असून कल्याण न्यायालयात आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून घोटाळ्यातील रकमेचा तपशील, ती कुठे गुंतवली किंवा वळवली गेली याचा तपास केला जाईल. EOW च्या टीम्स त्यांची कसून चौकशी करत आहेत. चार आरोपी फरार आहे त्यांचा देखील शोध पोलीस करत आहे.
पोलिसांनी काय आवाहन दिले?
पोलिसांकडून गुंतवणूकदारांना अश्या जास्त परताव्याच्या अमिषाला बळी न पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घोटाळ्यामुळे डोंबिवलीतील अनेक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे.
Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या