राज्यात एकनाथ खडसे यांच्या जावयांना अटक केल्यानंतर खडसे परिवारावर आरोप करण्यात येत होते . प्रांजल खेवलकर यांना कथित ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. खराडीतील एका खाजगी ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ड्रग्सच सेवन केल्याच्या आरोपाखाली प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना अटक केली होती . मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे . प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सच सेवन केल नसल्याचं समोर आल आहे .
कोण आहेत प्रांजल खेवलकर ?
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई आहेत . प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यावर माझ्यावरील राजकीय सूड जावयावर काढला जातोय अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती . मात्र स्वतः रोहिणी खडसे या पतीसाठी वकील बनून न्यायालयात हजर होत्या . मात्र आता त्यांना या प्रकरणात जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे .तब्बल दोन महिने प्रांजल खेवलकर यांना जेलमध्ये रहाव लागल. मात्र अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे .
प्रांजल खेवलकर कोणत्या प्रकरणात होते अटकेत ?
पुण्यातील खराडी भागात एका ठिकाणी कथित ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती . त्या नंतर अनेक महिलांचं कनेक्शन उघड झाल्याची माहिती सांगण्यात येत होती. महिलांचे परवानगीशिवाय फोटो आढळून आले अस सुद्धा सांगण्यात आल. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आल. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग देखील सापडले होते असे समोर आले होते. मात्र २५ तारखेला त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे . बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेनी खेवलकर यांच्या विरोधात राज्य महिला आयोगात तक्रार पण केली होती .आता थेट फॉरेंसिक रिपोर्टमध्येच ड्रग्सच सेवन केल नसल्याचं स्पष्ट झालं आहे . त्यामुळे खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे .