समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण
नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण करू लागला. यातून ती गभर्वती झाली. पण नंतर याप्रकरणातील आरोपी पीडित मुलीला सातत्याने त्रास देऊ लागला. इतकेच नाहीतर त्याने ते फोटो आणि व्हिडिओही व्हायरल केले. त्यानंतर अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
हेदेखील वाचा : जुना वाद अन् भररस्त्यात हत्या; मुंबईत 18 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
साहिल सिद्धार्थ नितनवरे (वय 19, रा. डिफेंस कॉलनी, वाडी) असे आरोपीचे नाव आहे. साहिल हा बीएच्या प्रथम वर्षाला शिकतो. त्याचे वडील शेती तर आई धुणी-भांडी करते. पीडित मुलगी बी. कॉमच्या प्रथम वर्षाला शिकते. सिद्धार्थ आणि पीडिता दोघेही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात शिकत होते. आठवी ते बारावीपर्यंत सोबतच होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे.
पीडिता दहावीत असताना त्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला. तो सतत तिचे लैंगिक शोषण करत होता. बारावीनंतर दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयातून शिक्षण घेत असले तरी त्यांची मैत्री कायम होती. या दरम्यान त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नाहीतर याप्रकाराचे व्हिडिओ आणि फोटोही काढले.
सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल
यादरम्यान पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत कळले. त्यानंतर पीडितेने त्याच्यापासून दुरावा केला. यामुळे संतापून आरोपीने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामी केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : प्रियकरासोबत पत्नीने केली शिवसैनिक विष्णू गवळी यांची हत्या, अनैतिक संबंध ठरले कारणीभूत