जुना वाद अन् भररस्त्यात हत्या; मुंबईत 18 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद (फोटो सौजन्य-ट्विटर)
मुंबईतील गोवंडीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. मोहम्मद सईद पठाण या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी त्याला गाठलं. त्यांनी जुनं भांडण उकरून काढली. एका मुलाने मोहम्मदच्या पाठीवर वार केला. त्यानंतर दुसऱ्याने कंबरेवर वार केला. या हल्ल्यात मोहम्मद रस्त्यावरच पडला. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
हे सुद्धा वाचा: डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण…, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
१८ वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने घटनेनंतर पळून गेला आहे. पोलीस त्याच्या शोधावर आहे.
मोहम्मद सईद पठाण हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. त्या हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. सर्व जण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरु होते. दरम्यान मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस आता मुख्य आरोपीच्या शोधात आहे. ही थरकाप उडवणारी हत्याचे दृष्ये मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
हे सुद्धा वाचा: कंपाउंडमध्ये कचरा जाळताना भयंकर स्फोट, माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई क्राइम ब्रँच युनिट 6 ने गोवंडीतील घराबाहेरून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलाला त्याच्या कुटुंबासोबत यशस्वीरित्या परत मिळवून दिले. पोलिसांच्या पथकाने त्याच्या शोधात कोणतीही कसर सोडली नाही आणि वेगवेगळ्या भागात मुलाच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली. यामध्ये स्थानिक मशिदी आणि मुलांचे आश्रयस्थान तपासणे तसेच सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करणे समाविष्ट होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे, मुल त्याच्या घरापासून 2 किलोमीटरहून अधिक दूर सुरक्षित सापडले, जिथे तो चुकून त्याच्या शेजारी भटकला होता. मुलाचे वडील तबरेज अन्सारी, जे 27 वर्षांचे असून, गोवंडीतील बैगनवाडी येथे राहतात, त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा 8 ऑगस्ट रोजी दुपारी बेपत्ता झाला होता. “माझा मुलगा बेपत्ता झाला तेव्हा तो आमच्या घराबाहेर खेळत होता. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रात्रीपर्यंत कोणताही पत्ता लागला नाही, त्यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो,” असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.