Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2025 | 12:30 AM
कात्रज घाटातील 'त्या' तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

कात्रज घाटातील 'त्या' तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता.

सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा मृतदेह सौरभ आठवलेचा असल्याची समोर आले. सौरभ १८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल होती.

आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे राहायला

पोलिसांनी सौरभचे मित्र, नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्यातून ठोस काही हाती लागले नव्हते. तांत्रिक तपासात सौरभचा खून अल्पवयीनांनी केल्याची माहिती पोलिस अंमलदार अक्षय नलावडे यांना मिळाली. त्यानूसार, कात्रज घाट परिसरात तिघांना पकडण्यात आले. मांगडेवाडीत अल्पवयीन त्याच्या आत्याकडे राहत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. सौरभही या भागात राहत होता. तो मुलीला बहीण मानायचा. तो तिला दररोज शाळेत सोडत. त्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. नंतर अल्पवयीन आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे राहायला गेला.

तीन मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त

सौरभमुळे प्रेमसंबंधात अडथळे आल्याचा त्याचा समज झाला. त्यामुळे तो रागात होता. त्याने साथीदारांच्या मदतीने सौरभच्या खुनाचा कट रचला. सौरभला त्यांनी कात्रज बोगद्याजवळ भेटण्यास बोलविले. सौरभला डोंगरावर नेऊन आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलिस तपासात ही माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अटक केलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Police have arrested three people who murdered a young man in katraj ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

हडपसरच्या टिपू पठाण टोळीला दणका; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
1

हडपसरच्या टिपू पठाण टोळीला दणका; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार
2

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

भावाच्या खुनानंतर गुन्हेगारीत प्रवेश, पुण्याच्या मध्यभागात दहशत; वाचा उमेश चव्हाण टोळीचा संपूर्ण इतिहास
3

भावाच्या खुनानंतर गुन्हेगारीत प्रवेश, पुण्याच्या मध्यभागात दहशत; वाचा उमेश चव्हाण टोळीचा संपूर्ण इतिहास

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी
4

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.