चक्क श्वानावर अत्याचार वर्धा जिल्ह्यातील घटना; आरोपीचा शोध सुरू
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच वर्धा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६७ वर्षांच्या व्यक्तीने कुत्र्यावरच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील मौजा धनोडी गावात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा धनोडी गावा राहणारी एक व्यक्ती हे भयंकर कृत्य केले. गावातील शाळेजवळ आरोपी कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. गावातील नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ प्राणी तक्रार दाखल केली. प्राणीप्रेमींनी या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला तत्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केली.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र हादरला! पंढरपूरला देव दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दौंडच्या स्वामी चिंचोलीमधील घटना
याआधी नागपूरमध्ये गायीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यानंतर आता श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र राज्य हादरले आहे.
हेदेखील वाचा : Thane Crime : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त