
ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन, या भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता (फोटो सौजन्य-Gemini)
कोकण आणि मुंबई भागात हवामान ढगाळ वातावरण आहे. सकाळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई-ठाणे परिसरात हलका धुक्यासह पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. दुपारी मुंबईत आकाश अंशतः ढगाळ असेल. किनाऱ्यावर मध्यम ते जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दुपारी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस राहील.
मुंबई महानगर परिसरात थंडीचा प्रभाव काहीसा सौम्य असून पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. कुलाबा येथे किमान तापमान १९.३ अंश तर सांताक्रूझ येथे १७.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ठाणे परिसरात किमान तापमान २० अंशांच्या आसपास असून दिवसाच्या वेळेत ऊन आणि हलका वारा यामुळे हवामान कोरडे राहिले. पुढील दोन दिवसांत मुंबईत ढगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असली तरी लक्षणीय पावसाचा अंदाज नाही.
खुळे यांच्या मते, या ११ जिल्ह्यांत तसेच आसपासच्या भागात शुक्रवार, ६ फेब्रुवारीपर्यंत पहाटेच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून सध्या जाणवत असलेली थंडी कमी होईल.
मात्र उर्वरित राज्यातील २५ जिल्ह्यांत गुरुवार, २९ जानेवारीपर्यंत सध्यासारखीच थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
त्यानंतर ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान या भागांतही थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून, म्हणजे शनिवार, ७ फेब्रुवारीनंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात पुन्हा हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही खुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवृत हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार सोमवार व मंगळवार (२६ व २७ जानेवारी) रोजी सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा आणि अमरावती या ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा हलका पाऊसही पडू शकतो.
अहमदनगरमध्ये – ११.४ अंश
जेऊरमध्ये – ९९ अंश
मोहोळमध्ये – १९८ अंश
नाशिक – १२.६ अंश
सातारा – १२.६ अंश
महाबळेश्वर – १३.१अंश
जळगाव – १३.५