जुन्नर: जुन्नर येथे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरण जवळ जुन्नर – नारायणगांव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप जीपची मोटरसायकलला धडक बसुन मोटरसायकलवरील अमजद पीरखान पठाण (वय-४८, राहणार बादशाह तलाव, ता. जुन्नर) यांचा जागीच मृत्यू झाला असुन, त्यांची पत्नी रुकसाना (वय-४६) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर अपघात प्रकरणी पिकअप चालक ज्ञानेश्वर सुधाकर कांबळे (वय-23 रा. कळंब, ता. आंबेगाव) याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अमजद पठाण यांचा मुलगा आजारी असल्याने त्याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुलाची भेट घेऊन अमजद पठाण व त्यांची पत्नी हे मोटरसायकलवर बादशाह तलाव येथे घरी येत होते. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव – जुन्नर रस्त्यावरील कुरण जवळ जुन्नरवरून नारायणगावच्या दिशेने येत असलेल्या पिकअप जीपची मोटरसायकलला धडक बसली. या अपघातात अमजद पठाण हे जागीच ठार झाले.तर त्यांच्या पत्नी रुकसाना या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
जुन्नर – नारायणगांव रस्त्यावर जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय ते वीट भट्टी दरम्यान दोन्ही बाजूने उतार असल्याने या दरम्यान वाहनांचा वेग जास्त असतो व या रस्त्यावरील २०० मीटर भागात वारंवार अपघात होत आहेत. यापूर्वी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही जागा अपघातग्रस्त असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावेत. अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थी व बादशाह तलाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बारामतीमध्ये भीषण अपघात
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
Pune Baramati Accident: बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.