Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

नाशिकमधील काही भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास ठरत आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे चारचाकीसह दुचाकी वाहणाच नुकसान होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 11:29 AM
राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात (फोटो सौजन्य-Gemini)

राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा
  • महिनाभरात सहा ते सात अपघात
  • अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित
सिन्नर : सिन्नर-निफाड राज्यमार्गावरील सिन्नर शहराजवळील उकाडे मळ्याजवळ रस्त्याच्या मध्यवर्ती भागातील खड्डा जीवघेणा ठरत आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला हा रस्ता प्रवाशांसाठी काळ बनू आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीविताशी खेळणारे ठरत आहे. सिन्नर-निफाड हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. कानडी माळ्याच्या पुढे उकाडे मळ्याजवळ गारे इंटरप्राईजेसच्या समोर रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित केला जात आहे.

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

या खड्यामुळे महिनाभरात सहा त्यात एक महिला जायबंदी झाली आहे. दुचाकीवरून पडलेल्या जखमींना स्थानिक रहिवासी बऱ्याचदा उचलून अॅम्बुलन्स मध्ये उपचारासाठी रवाना करतात. स्थानिकांना हा त्रास नेहमीचाच झाला असून, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्थानिकांच्या जीवावर उठले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक सिराज शेख यांनी दिली.

चारचाकीसह दुचाकी वाहने आदळून होतेय नुकसान, अपघात स्थानिकांची मदत

दोन्ही बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकांना या रस्त्याच्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने त्यात दुचाकी आदळून अपघात होत आहेत. दुचाकीवरून उडून चालक किंवा पाठीमागे बसलेला प्रवासी रस्त्यावर पडून जखमी होण्याच्या गेल्या महिन्याभरात सहा ते सात घटना घडल्या आहेत. चारचाकी वाहने आदळूनही त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक रहिवासी धावपळ करून जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम विभागाला या संदर्भात अवगत करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभाग प्रवाशांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

स्थानिकांनी पांढऱ्या रंगाने रंगवला उपद्रवी खड्डा

हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात यावा यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेऊन त्यावर चारही बाजूने पांढऱ्या रंगाचा पट्टा मारला आहे. मात्र, दूरवरून तो लक्षात येत नसल्याने अपघात नित्याचेच झाले आहेत.

तसेच तारवालानगर ते अमृतधाम लिंक रोडवर पावसाळा सुरू होण्याअगोदरपासून खड्डे पडलेले आहेत . मात्र मनपा प्रशासनाने याबाबत कुठलेही गांभीर्य दाखविले नाही, परिणामी एका सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी गेला, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.

शिंदे गटाचा पाठिंब्याने MIMला मिळणार उपमहापौरपद? मालेगावात राजकारण तापलं

Web Title: The pothole in the middle part of the road near ukade malya close to sinnar city is becoming dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Accident
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
3

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.