Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई

 कराडमध्ये कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्यांचा गैरप्रकार पोलीसांकडून उघड झाला आहे. 42 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 05:30 PM
Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
  • लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात
  • विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई
  • नेमकं प्रकरण काय ?
सातारा :   कराडमध्ये कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्यांचा गैरप्रकार पोलीसांकडून उघड झाला आहे. साडेचार लाख रुपये बिलांपैकी 42 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ओगलेवाडी येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

टेंभू उपसा सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता आनंद रामदास काळमेघ (वय 51, रा. सिल्वर ओक बिल्डिंग, सैदापूर कराड, मूळ रा. मार्केट यार्ड, पुणे) व कनिष्ठ अभियंता माधुरी साई देवरे (वय 35, रा. सिल्वर गार्डन अपार्टमेंट, बनवडी फाटा, कराड) अशी लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिक विद्युत पथक योजनेला सेक्युरिटी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम तक्रारदार करतात. त्याअंतर्गत त्यांनी प्रतिदिन 610रुपयेप्रमाणे तीन सुरक्षारक्षक पुरवले होते. या सुरक्षारक्षकांचे एकूण 5लाख 94हजार 720 रुपये बिल कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयाला टेंभू कार्यालयाकडून पाठविण्यात आले. दि. 12 नोव्हेंबर रोजी या बिलापैकी 4 लाख 66 हजार 960 रुपये तक्रारदाराच्या खात्यावर जमा झाले. मात्र, हे बिल मंजुरीला पाठवल्याच्या मोबदल्यात बिलाच्या 3 टक्केप्रमाणे कनिष्ठ अभियंता माधुरी देवरे यांनी लाच मागितली होती.

Delhi Crime: मैत्रीचा किंमत जीव! बहिणीशी मैत्री केली म्हणून भावाचा संताप, 17 वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

‘लाचलुचपती’ची ‘टेंभू’त कारवाई
19 नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष माधुरी देवरे यांनी 17 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच कार्यकारी अभियंत्यांनाही भेटण्यास सांगीतले. त्याप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी कारवाईवेळी कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ यांनी तक्रारदाराकडे 30हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार दि. 28 रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आनंद काळमेघ हे 25 हजार रुपये तर माधुरी देवरे या 17 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ आढळल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

Web Title: Police action against executive engineer of electrical team caught red handed while accepting bribe in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन
1

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
2

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
3

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
4

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.