Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

रेतीघाटातील व्यवहारात १ कोटी रुपये देवाण-घेवाणचा वाद होता. आरोपी व मृत नागपालच्या साथीदारांत फोनवर शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. आम्ही घाटावर आहो, येथे या, बोलणे करू असे सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 03:30 PM
रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्...

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्...

Follow Us
Follow Us:

हिंगणघाट : हिंगणघाट तालुका आणि चंद्रपूरच्या वरोरा तालुक्याच्या सीमेवरील रेतीघाटात रेतीघाटाच्या सीमावादातून सिनेस्टाईल हाणामारी झाली. यात तिघे जखमी झाले, तर पुलगाव येथील भाजप शहर महामंत्री भारत नागपाल यांचा मृत्यू झाला. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या बाबर्डा रेतीघाट आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणारा ढिवरी पिपरी रेतीघाट नदीच्या मधातून विभागला गेला आहे. भारत नागपाल यांच्या मालकीच्या रेतीघाट हद्दीत आरोपींनी शिरून रेतीचा उपसा बोट, पोकलँडच्या सहाय्याने सुरू केला होता. मागील वर्षी बाबर्डा रेतीघाट नागपाल व वानखेडे यांनी घेतला होता. यावर्षी तो आरोपींना दिला. या रेतीघाटातील व्यवहारात १ कोटी रुपये देवाण-घेवाणचा वाद होता. आरोपी व मृत नागपालच्या साथीदारांत फोनवर शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. आम्ही घाटावर आहो, येथे या, बोलणे करू असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपी सौरभ ठाकूर हा आपल्या २०-२५ साथीदारांसह घाटात आला.

तर नागपाल व त्याचे साथीदार पंकज वानखेडे, अमोल ठोंबरे, अमित साहू व अन्य चारचाकी गाडी घाटात नदीपात्राच्या बाजूला उभी करून नदी पात्र शेजारी होते. दरम्यान, आलेल्यांची गाडी सहज निघू नये म्हणून आरोपींनी रस्त्यावर पोकलँड मशीन उभी करून रस्ता अडविला. तर काही कळण्यापूर्वीच नागपाल, त्याच्या साथीदारावर आरोपींकडून हल्ला चढविला. यात भारतचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा हल्ला होताच नागपाल याच्या साथीदारांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत अमित साहू, पंकज वानखेडे, अमित ठोंबरे यांनाही दुखापत झाली. मारेकऱ्यांनी तलवार व इतर शस्त्राने भारत यांना मारहाण करून त्यास नदीच्या पाण्यात फेकून पळ काढल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनेनंतर रेतीघाटात संतप्तांनी उभ्या जेसीबीची तोडफोड केली. याशिवाय तेथे उभ्या असलेल्या काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याने काहीकाळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच वरोरा, हिंगणघाट, वडनेर आदी ठिकाणच्या पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.

तोंड दाबून खून केला

या प्रकरणातील आरोपींनी भारत नागपाल याच्यावर पहिला हल्ला केला. तर नंतर नदीच्या पाण्यात भारतचे तोंड दाबून त्यास ठार केले. त्यानंतर मृतदेह नदी पात्रात फेकून पळ काढला. आरोपी वर्धेच्या दिशेने पळ काढत असल्याची माहिती मिळाल्यावर दारोडा टोल प्लाझावर वडरेन पोलिसांनी कार अडवून आरोपी सौरभ ठाकूर व काही आरोपींना ताब्यात घेत वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येते.

हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

Web Title: Youth killed over sand pit dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद
1

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई
2

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

Nagpur  : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !
3

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
4

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.