Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस की, खंडणीखोर! कारवाईच्या धाकाने तीनवेळा उकळले पैसे

कोरेगाव पार्क परिसरात आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याला कारवाईचा धाक दाखवत पोलिसांनी तीनवेळा पैसे उकळले. चौकशीतून खंडणी उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2025 | 12:30 AM
पोलीस की, खंडणीखोर! कारवाईच्या धाकाने तीनवेळा उकळले पैसे

पोलीस की, खंडणीखोर! कारवाईच्या धाकाने तीनवेळा उकळले पैसे

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याला कारवाईचा धाक दाखवत पोलिसांनी तीनवेळा पैसे उकळले. पुढे काही अंतर आल्यानंतर सुरू असलेल्या नाकाबंदीत अडकण्याच्या भितीने त्याने गाडी वेगात बॅरीकेटला धडकून पळवली. त्यात एक महिला पोलिस हवालदार जखमी झाल्या. यानंतर त्याला पकडले. तेव्हा चौकशीतून खंडणी उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिस की, खंडणीखोर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पोलिसांवर कारवाई केली असून, त्यांना “देय वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारण राहणार नाही, अशा रितीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे” अशी शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय असे बेशिस्त, बेपर्वा, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सहायक निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे (नेमणूक विशेष शाखा), पोलीस हवालदार सुहास भिमराव धाडगुडे (नेमणूक लष्कर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार प्रकाश दादासो कट्टे (नेमणूक, फरासखाना पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन कल्याण वाघमोडे (नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही घटना नायडु हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेज समोर वेलेस्ली रोड येथे ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडली होती.

माळालेल्या माहितीनुसार, नाकाबंदीच्या वेळी ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. जहांगीर चौकाकडून आलेल्या एका कारचालकाने बॅरीकेटला धडक देऊन तेथे कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस हवालदार दीपमाला नायर यांना ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अर्णव सिंघलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला. त्यात सिंघलने सांगितले की, कोरेगाव पार्कमधील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी त्याच्याकडून ५ हजार रुपये घेतले. तसेच त्याच दिवशी लेन नं. ७ येथे पब्लीक पब येथे जाताना पबपासून काही अंतर थांबलो असताना तेथे एक टोव्हिंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये गाडी असल्याने १० हजार रुपये भरण्यास सांगून अडीच हजार रुपये घेतले.

तर ९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री एकच्या सुमारास घरी जाताना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायाझर चेकिंग केली, त्यात अल्कोहोल नसल्याचे दिसून आले. तरीही ‘तुम सब दारू पिये हो’, असे बोलून त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले होते, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे सिंघल यांनी चौथ्यावेळेस नाकाबंदीतून वाचण्यासाठी गाडी सुसाट चालवली. पण तेव्हा त्यांनी एका महिला अंमलदाराला उडविले.

कॅमेर्‍याच्या नजरेतून दुर, तोंडाला मास्क

नाकाबंदीत कारवाईच्या धाकाने खंडणी उकळण्यासाठी पोलिस चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसून आले आहे. पैसे घेताना आपण कॅमेर्‍यात येऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेत होते. तसेच उद्या एखाद्याने तक्रार केली तर आपला चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तोंडाला मास्क देखील लावत असे. त्यांचे हे वर्तन अक्षेपार्ह आणि संशयास्पद असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हंटले आहे.

Web Title: Police extorted money from a person three times due to fear of action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या
1

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध
2

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…
3

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…
4

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.