Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रावेत गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट, बिष्णोई गँगने जेलमधूनच दिली सुपारी; अडीच लाखात डील अन्…

पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध 'ए.जे. फर्निचर मॉल'च्या मालकावर खंडणीसाठी केलेल्या गोळीबार प्रकरणात तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 04:12 PM
रावेत गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट, बिष्णोई गँगने जेलमधूनच दिली सुपारी; अडीच लाखात डील अन्...

रावेत गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट, बिष्णोई गँगने जेलमधूनच दिली सुपारी; अडीच लाखात डील अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध ‘ए.जे. फर्निचर मॉल’च्या मालकावर खंडणीसाठी केलेल्या गोळीबार प्रकरणात तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुपारी देणारा आरोपी कुलदीप उर्फ कशिष याने जालिंदर कारागृहातुन शिक्षा आरोपीशी संपर्क साधून सुपारी दिली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच याच गँगने शहरातील इतर दोन व्यवसायिकांना फोन करुन सुमारे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचेही समोर येत आहे.

 

गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने आरोपींना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली. या आरोपींना न्यायालयाने २८ मे २०२६ पर्यंत ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील आरोपी कुलदीप उर्फ कशिष याने आरोपी परवीन (परवेज) याच्याशी सर्वात आधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’ वरून संपर्क साधला होता. “बिष्णोई टोळीसाठी काम करणार का?” अशी विचारणा कशिषने त्याला केली होती. त्याला आरोपी तयार झाल्यानंतर कशिषने त्यांना सुरक्षित संवादासाठी ‘सिग्नल’ ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.

या ॲपच्या माध्यमातून त्यांच्यात पुढील संवाद झाला आणि फर्निचर व्यवसायिकावर गोळीबार करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात आली. सुपारी ठरल्यानंतर बिष्णोई टोळीचा सदस्य आरजु बिष्णोई याने मध्यस्थांमार्फत आरोपींना २ पिस्तूल, काडतुसे, पैसे आणि वाहने पुरवली. आरोपींना आधी चंदिगढ येथे बोलावून पिस्तूल चालवण्याचे (फायरिंगचे) विशेष प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आरोपी खाजगी ट्रॅव्हल्सने पुण्यात दाखल झाले. पुण्यात आल्यावर त्यांनी एका लॉजमध्ये एक दिवस मुक्काम करून गुन्ह्याची पूर्ण रेकी केली होती.

‘ए.जे. फर्निचर’चे मालक जगदीश भेराराम बिष्णोई आणि त्यांचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांच्याकडे मोबाईल क्रमांक +1 (912) 310-3107 वरून व्हॉट्सॲप कॉलद्वारे २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी बिष्णोई गँगने दिली होती. मात्र, व्यावसायिकाने या धमकीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याच रागातून १५ मे २०२६ रोजी रात्री ९ च्या सुमारास जगदीश बिष्णोई हे ताथवडे ते रावेत बी.आर.टी. रोडवरील पुनावळे येथील आपल्या फर्निचर मॉलबाहेर बसलेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्खोरांनी त्यांच्यावर जवळून ५ ते ६ राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात जगदीश बिष्णोई थोडक्यात बचावले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ७ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींच्या वास्तव्याचा संशय असलेल्या लॉजेसची झाडाझडती घेतली असता एका लॉजमधील माहितीवरून आरोपींची नावे समोर आली.

तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी हरियाणातील रोहतक येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक तात्काळ रोहतकमध्ये दाखल झाले आणि सलग ४ दिवस शोध घेतला. तेथून आरोपी हरिद्वारला पळाल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने हरिद्वार गाठून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

परवीन रामनिवास (वय २२ वर्षे, रा. झज्जर, हरियाणा ), पंकज कुलदीप (वय २१ वर्षे, रा. रोहतक, हरियाणा) आणि सागर अजयपाल (वय २१ वर्षे, रा. सोनेपत, हरियाणा) या तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी दोघे फरार आहेत. तसेच अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

शहरातील ‘गोल्डमॅन’ सनी वाघचौरेसह इतर व्यापाऱ्यांनाही धमक्या

बिष्णोई टोळीने यापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध ‘गोल्डमॅन’ सनी वाघचौरे आणि दिघी येथील एका मोठ्या व्यापाऱ्याला (वीर फर्निचरचे मालक) फोनवरून अशाच प्रकारे धमक्या दिल्या आहेत. तसेच संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही या टोळीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकरणांमध्ये या अटक केलेल्या आरोपींचा काही सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार (गुन्हे), गणेश इंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक संदीप सावंत, रावेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन फटांगरे, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, समीर लोंढे, मयुरेश साळुंखे व अंमलदारांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police have arrested the accused in the ravet firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • Lawrence bishnoi Gang
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी
1

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
3

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
4

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.