Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुने वाद अन् किरकोळ कारणांवरून टोळक्यांचा धुडगूस; पुण्यात तीन घटनांनी खळबळ

जुन्या वादांची खदखद पुन्हा उफाळून आल्याने पुणे शहरात टोळक्यांची मुजोरी वाढल्याचे चित्र आहे. चतु:शृंगी, बिबवेवाडी आणि नांदेड सिटी परिसरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये टोळक्यांनी धुडगूस घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 03:25 PM
जुने वाद अन् किरकोळ कारणांवरून टोळक्यांचा धुडगूस; पुण्यात तीन घटनांनी खळबळ

जुने वाद अन् किरकोळ कारणांवरून टोळक्यांचा धुडगूस; पुण्यात तीन घटनांनी खळबळ

Follow Us
Follow Us:
  • तीन ठिकाणी टोळक्यांचा धुडगूस
  • तरुणावर जीवघेणा हल्ला
  • कोयते फिरवत परिसरात दहशत
पुणे : जुन्या वादांची खदखद पुन्हा उफाळून आल्याने पुणे शहरात टोळक्यांची मुजोरी वाढल्याचे चित्र आहे. चतु:शृंगी, बिबवेवाडी आणि नांदेड सिटी परिसरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये टोळक्यांनी धुडगूस घातला आहे. एका घटनेत तरुणाचा खूनाचा प्रयत्न झाला, तर अन्य दोन ठिकाणी टोळक्यांनी दहशत माजवत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. किरकोळ वाद किंवा जुने हिशेब चुकते करण्याच्या मानसिकेतून हे टोळके रस्त्यावर दहशत माजवत असल्याचे चित्र आहे.

 

चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औंध येथे जुन्या वादातून १९ वर्षीय विघ्नेश चौगुले (वय १९) याच्यावर हल्ला केला. संगणमत करून त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुरूवारी दुपारी ही घटना राजीव गांधी ब्रीज येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद महेंद्र घोरपडे (वय १९), अनिकेत किशोर लसंडगे (वय १९, रा. औंध) यांना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विघ्नेश याच्या मित्राने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा प्रकार जुन्या वादातून घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काका पुतण्यावर वार, दहशतही माजवली

बिबवेवाडी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने काका-पुतण्यावर वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह पाच जणांना पकडले आहे. हल्यानंतर टोळक्याने हत्यारे हातात घेऊन ते हवेत फिरवत परिसरात दहशत देखील माजवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज उर्फ सोन्या लक्ष्मण जठार (वय १९, रा. बिबवेवाडी), गणेश बाळु कोळी (वय २१), लक्ष्मण उर्फ लक्ष्या श्रीधर जठार (वय २२) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तक्रारदार व त्यांचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रामभाऊ गरज करत आहेत.

हे सुद्धा वाचा : जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

गाडीला कट मारल्यावरून दहशत

गाडीला कट मारल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या दोन साथीदारांनी तरुणाच्या घराजवळ तसेच परिसरात हातात कोयते घेऊन ते हवेत फिरवत दहशत माजविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी निवृत्ती मुक्ताराम मोरे (वय २१, रा. नर्हे) तसेच रोशन राजु लांडगे (वय १९, रा. धायरी) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याबाबत नांदेड सिटी पोलिस ठाण्यात १९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तरुण धायरी येथून जात असताना खडक चौकात त्याच्याकडून आरोपींच्या गाडीला कट लागला. यावरून त्यांनी वाद घातला. तसेच गाडीला कट का मारला म्हणत त्याला मारण्यासाठी अंगावर धावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच्या परिसरात जाऊन दहशत माजवली. अधिक तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात टोळक्यांच्या दहशतीच्या किती घटना घडल्या?

    Ans: चतु:शृंगी, बिबवेवाडी आणि नांदेड सिटी परिसरात टोळक्यांनी दहशत माजविल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या.

  • Que: चतु:शृंगी परिसरातील घटनेत काय घडले?

    Ans: औंध येथील राजीव गांधी ब्रीजजवळ जुन्या वादातून १९ वर्षीय विघ्नेश चौगुले याच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.

  • Que: नांदेड सिटी परिसरात टोळक्याने दहशत का माजवली?

    Ans: गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणासोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कोयते हवेत फिरवत तरुणाच्या घराजवळ आणि परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी दोघांना अटक करून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Gangs have created terror in three locations in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pandharpur Crime News: शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् गोळ्या झाडून संपवलं! राजकीय वैमनस्यातून झाला खुन
1

Pandharpur Crime News: शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् गोळ्या झाडून संपवलं! राजकीय वैमनस्यातून झाला खुन

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.