Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशेसाठीच्या औषधाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; तब्बल 160 बाटल्या जप्त

नशेसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदेशीररीत्या विक्री करणार्‍या एका महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली. महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2024 | 05:36 PM
नशेसाठीच्या औषधाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; तब्बल 160 बाटल्या जप्त

नशेसाठीच्या औषधाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; तब्बल 160 बाटल्या जप्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : नशेसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदेशीररीत्या विक्री करणार्‍या एका महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १ लाख रुपये किंमतीच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) तब्बल १६० बाटल्या जप्त केल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय२६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत. यादरम्यान, हडपसर पोलिसांचे पथक गुरुवारी (दि.२६) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी महिला बेकायदेशीररित्या नशेच्या औषधाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या १६० बाटल्या जप्त केल्या.

आरोपी अंबिका ऊर्फ नेहा ठाकुर हिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नाही. तसेच, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषधमध्ये केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असताना सुद्धा अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता मिळून आली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे व गायत्री पवार यांच्या पथकाने केली आहे.

चारशे ते पाचशे रुपयांना विक्री

संबंधित महिला यापूर्वी नशामुक्ती केंद्रात राहून आलेली आहे. त्यानंतर तिने अशाप्रकारे औषध विक्री सुरू केली. औषधाची बाटली चारशे ते पाचशे रुपयांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने हे औषध कोठून आणले, याबाबत हडपसर पोलीस तपास करत आहेत. यापूर्वी देखील या औषधाच्या अवैध विक्रीचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. त्यामुळे शहरात असे विक्रेते सक्रिय असल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा : सतीश वाघ खूनप्रकरणी मोठी माहिती समोर; पत्नीचे अनैतिक संबंध की….

गेल्या काही महिन्यांपासून नशेचे ढोस तसेच ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या काही महिन्याखाली पुण्यात नशेसाठीच्या इंजेक्शनची विक्री केल्याचेही उघड झाले होते. नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणार्‍या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफेंटरमाईन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनच्या ३९ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ओंकार अंगद बिनवडे (वय २१, रा. काडेपडळ रस्ता, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बिनवडे याच्यावर हडपसर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १२३, २७५, २७८, १२५ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police have arrested the woman who was selling the medicine nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 05:36 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News : भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी
1

Dharashiv News : भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी

Bandra Demolition : वांद्रे गरीब नगर झोपडपट्टीवर कारवाईवेळी तणाव; पोलिसांवर पाणी-बादल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज
2

Bandra Demolition : वांद्रे गरीब नगर झोपडपट्टीवर कारवाईवेळी तणाव; पोलिसांवर पाणी-बादल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा
3

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त
4

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.