Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे फटाके फेकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २ गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी तरुणीचा विनयभंगही केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 11, 2026 | 01:50 PM
दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?

दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा!
  • तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण
  • नेमकं काय घडलं?
मलकापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे फटाके फेकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २ गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घराजवळ फटाके उडवण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून मारहाण करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात मलकापूर शहर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

 

संतोष अरुण संबारे (वय ४५, रा. गायत्रीनगर, अकोला) हे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आले होते. रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आरोपी दीपक माणिकराव संभारे (वय २२), रोशन माणिकराव संभारे (वय २५), हरीश श्रीकृष्ण संभारे (वय २४) आणि पप्पू अरुण संभारे (सर्व रा. बेलाड, ता. मलकापूर) हे त्यांच्या घरासमोर हातात फटाके घेऊन ते घराच्या दिशेने फेकत होते. यावेळी त्यांना माझ्या घराकडे फटाके टाकू नका, असे सांगितले असता या गोष्टीचा राग आल्याने आरोपी रोशन याने बुक्क्याने मारहाण केली. तसेच आरोपी दीपक संभारे याने नाकाखाली व डोळ्याखाली बुक्क्याने मारले. भांडण सोडवण्यासाठी पुतण्या धावून आला असता, सर्व आरोपींनी त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

हे सुद्धा वाचा : राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती

तरुणीला मारली मिठी

यावेळी आरोपी पप्पू संभारे याने पुतण्याच्या डोक्यात हातातील कड मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर वाद सोडवण्यासाठी संतोष यांची मुलगी तिथे आली असता, आरोपी पप्पू संभारे याने तिच्या साडीचा पदर ओढला, ज्यामुळे ती खाली पडली. ती उठून उभी राहिली असता आरोपी रोशन संभारे याने तिला वाईट उद्देशाने मिठी मारली. यानंतर आरोपी तिथून पळून गेले. या प्रकरणी तक्रारीवरून आणि मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारे मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे वाद कशामुळे झाला?

    Ans: घरासमोर फटाके उडवण्यास आणि घराच्या दिशेने फटाके फेकण्यास विरोध केल्यामुळे दोन गटांत वाद झाला.

  • Que: या प्रकरणात किती जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: या प्रकरणी दीपक संभारे, रोशन संभारे, हरीश संभारे आणि पप्पू संभारे अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: आरोपींविरोधात कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: मारहाण आणि तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.

Web Title: A clash broke out between two groups over the bursting of firecrackers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले
1

नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले

घराची ग्रील तोडून दोन लुटारू आत शिरले; वृद्ध दाम्पत्याला धमकावत सोन्याचे दागिने अन् रोकड लंपास
2

घराची ग्रील तोडून दोन लुटारू आत शिरले; वृद्ध दाम्पत्याला धमकावत सोन्याचे दागिने अन् रोकड लंपास

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

५०० रुपयांच्या वादातून राडा! पती- पत्नीला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

५०० रुपयांच्या वादातून राडा! पती- पत्नीला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.