
मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी
शीतल तेजवानीला 4 दिवसांची पोलिस कोठडी
मुंढवा येथील भूखंड प्रकरणात कोर्टाचा निर्णय
शीतल तेजवानीला बुधवारी करण्यात आली होती अटक
पुणे: मुंढव्यातील जमीन घोटाळाप्रकरणातील प्रमुख असलेल्या शीतल तेजवानी हिला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली. अवघ्या काही वेळा पूर्वीच तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान आज शीतल तेजवाणीची कोठडी संपल्याने तिला कोर्टात हजर करण्यात आले.
शीतल तेजवाणीला आज पोलिस कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी कोर्टाकडे 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्याचे समजते आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर कोर्टाने शीतल तेजवाणीला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.