Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: एसी कोचमध्ये महिला झोपली अन् बॅग गायब! ATM कार्डने 80 हजारांवर डल्ला,दोघे पोलिसांच्या ताब्यात

इंदोर-पुणे एक्सप्रेसच्या एसी कोचमधून महिलेची बॅग चोरीला गेल्यानंतर तिच्याच एटीएम कार्डने तब्बल ८० हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुजरातमधील दोन आरोपींना डोंबिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली असून, विशेष म्हणजे दोघांचेही नाव ‘मुकेश पुरोहित’ असे आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 03, 2026 | 09:09 AM
Pune Crime News: एसी कोचमध्ये महिला झोपली अन् बॅग गायब! ATM कार्डने 80 हजारांवर डल्ला,दोघे पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime News: एसी कोचमध्ये महिला झोपली अन् बॅग गायब! ATM कार्डने 80 हजारांवर डल्ला,दोघे पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  •  लॅपटॉप, आयफोन आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास
  • चोरीच्या एटीएम कार्डने ८० हजार रुपये काढल्याचा आरोप 
  • दोन्ही आरोपींचे नाव एकच असल्याचे आले समोर
डोंबिवली: रेल्वेच्या एसी कोचमध्ये महिला प्रवासी झोपेत असतानाच तिची बॅग चोरी करून त्यातील एटीएम कार्डच्या माध्यमातून तब्बल 80 हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी गुजरातमधील दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींचे नाव मुकेश पुरोहित आहे. मुकेश कांतीलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित अशी अटक आरोपींची नावे आहेत.

झोपेत असताना बॅग लंपास

एक महिला प्रवासी इंदोर-पुणे एक्सप्रेसने प्रवास करत होती. वसई आणि भिवंडी दरम्यान तिला झोप लागली. काही वेळाने झोपेतून उठल्यानंतर तिची बॅग गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. बॅगेमध्ये लॅपटॉप, आयफोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य होते.बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

हेही वाचा: Mumbai Accident News: घरात सवत पाहताच संतापली पहिली पत्नी; चाकूने प्राणघातक हल्ला, नंतर ११२ क्रमांकावर नक्की काय घडलं?

ATMमधून 80 हजार काढल्याचे उघड

तपास सुरू असताना पोलिसांना महिलेच्या चोरीला गेलेल्या एटीएम कार्डचा वापर झाल्याची माहिती मिळाली. या कार्डच्या माध्यमातून तब्बल 80 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पैसे ज्या एटीएममधून काढण्यात आले, त्याची माहिती मिळवून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. एटीएम व्यवहार आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुकेश कांतीलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांचा चोरीच्या घटनेशी संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाईल साहित्य खरेदीसाठी मुंबईत आले होते

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी गुजरातमधील एका मोबाईल दुकानात काम करतात. मोबाईलशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी ते मुंबईला आले होते. परतीच्या प्रवासात इंदोर-पुणे एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये त्यांनी महिलेची बॅग चोरी केल्याचा आरोप आहे. बॅग चोरी केल्यानंतर त्यातील एटीएम कार्डचा वापर करून 80 हजार रुपये काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू

डोंबिवली जीआरपी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींसोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, चोरीची बॅग, त्यातील साहित्य आणि एटीएममधून काढलेल्या पैशांबाबत पोलीस अधिक तपास करत असून  डोंबिवली जीआरपी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime news woman asleep in ac coach bag vanishes 80000 siphoned off using atm card two in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.