Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

पुण्यातील वानवडी परिसरात पहाटे पोलिस आणि सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबाराची घटना घडली. 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या करण सिंग या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडली. आरोपी जखमी असून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 02:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वानवडी परिसरात पोलिस आणि आरोपीमध्ये गोळीबाराचा थरार.
  • 30 हून अधिक गुन्हे दाखल असलेला करण सिंग जखमी.
  • पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडल्याची माहिती; तपास सुरू.
पुणे: पुण्यातील वानवडी परिसरात पहाटेच्या सुमारास गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. घरफोडीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने गोळी झाडली. या घटनेत आरोपी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार आज पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. एका सराईत आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या आरोपीवर 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nasrapur Case : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…

आरोपी वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्याकडील अग्निशस्त्रातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.

यावेळी पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत आरोपीच्या दिशेने गोळी झाडली. या घटनेत करण सिंग हा आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Pune Crime : पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्…

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रखवालदार म्हणून काम करतो. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात रिक्षाचालक पवार हे थांबले होते. त्यावेळी आरोपीने वैदुवाडीला जाण्यासाठ किती भाडे घेणार आहे, अशी विचारणा केली. भाड्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने रिक्षाचालक पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत पवार जखमी झाले. पोलीस हवालदार मुंढे अधिक तपास करत आहेत.

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

  • Que: जखमी आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: जखमी आरोपीचे नाव करण सिंग असून त्याच्यावर 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर गोळी का झाडली?

    Ans: आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिस अधिकाऱ्याने प्रत्युत्तरादाखल गोळी झाडल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Pune crime shootout between police and a notorious criminal in wanowrie accused involved in 30 cases arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.